रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 2023 | raksha bandhan Marathi Nibandha Mahiti 2023 |रक्षाबंधन मराठी भाषण | Raksha bandhan speech in Marathi|
रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 2023 | raksha bandhan Marathi Nibandha Mahiti 2023
रक्षाबंधन हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा म्हणतात.
रक्षाबंधन हा सण बहिण-भावाच्या पवित्र बंधनाचा सण आहे. रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे धागा.अर्थात रक्षणाचा पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन.. हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे सुंदर प्रतिक आहे..रक्षाबंधन या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. ती भावाच्या सुख, समृध्दी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो.. शिवाय भेटवस्तू ही देतो. या दिवशी घरो- घरी गोड पदार्थ बनवले जातात.
आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बहिणी दूर राहणाऱ्या भावाला कुरियरने राखी पाठवतात. या दिवशी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही अनेक बहिणी राखी पाठवतात. असा हा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे व सभ्यतेचे प्रतिक आहे.
रक्षाबंधन 10 ओळी मराठी निबंध | Raksha Bandhan nibandh marathi 10 lines
१.रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण आहे.
२.हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा
केला जातो...
३. या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हणतात.
४.रक्षा म्हणजे रक्षण व बंधन म्हणजे धागा.
५.या दिवशी बहीण भावाला राखी बांधते..
६.राखी ही विश्वास व विजयाचे प्रतीक मानली जाते.
७.भाऊ बहिणीला रक्षणाचे वचन देतो.
८.या दिवशी भाऊ बहिणीला सुंदर
भेटवस्तू ही देतो.
९. या दिवशी घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात.
१०. रक्षाबंधन हा सण स्नेहाचे प्रतीक मानले जाते.
FAQ
Q.1) रक्षा बंधन कधी साजरा केला जातो ?Ans.श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.
Q.2) रक्षाबंधन हा सण उत्तर भारतात आणि पश्चिम भारतात कोणत्या नावांनी साजरा केला जातो ?
Ans.उत्तर भारतात 'कजरी पौर्णिमा' पश्चिम भारतात 'नारळी पौर्णिमा' या नावाने तो साजरा केला जातो.