15 ऑगस्ट मराठी भाषण निबंध 2023 | स्वातंत्र्य दिवस भाषण मराठी 2023 | 15 August Marathi Bhashan Nibandh 2023 |15 August essay in Marathi
स्वातंत्र्य दिवस 2022 :- नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्य दिवसा बद्दल भाषण, निबंध आणि स्वातंत्र्य दिवसा बद्दल चारोळ्या बघणार आहोत.
15ऑगस्ट मराठी भाषण निबंध 2023| 15 August Marathi Bhashan Nibandh 2023
आज १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन! आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे.
भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर, इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या दिवशी आपण आपल्या शूर वीरांना वीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित 9 जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे. आपल्या दिशाला थोर महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी लाभलेले आहेत त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता, त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. आपापसातील वैर सोडून सर्व भारतीय एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र !
हे पण वाचा⤵️
FAQ
Q.1) स्वतंत्र दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans.१५ ऑगस्ट ला स्वतंत्र दिवस साजरा केला जातो.
Q.2) ब्रिटिशांनी भारतावर किती वर्ष राज्य केले ?
Ans. ब्रिटीशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले.
Q.3) आपल्या देशाची राज्यघटना कोनी लिहिली ?
Ans. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली.