रंगपंचमी सणाची संपूर्ण माहिती |रंग पंचमी मराठी माहिती निबंध | Rang panchami information in Marathi | Rang panchami essay in Marathi
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण सर्वांचा आवडीचा सन रंगपंचमी मराठी माहिती ( Rang panchami information in Marathi ) याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणारा आहोत हे तुम्हाला नक्कीच आवडेल.
रंगपंचमी सणाची संपूर्ण माहिती | Rang panchami information in Marathi
रंग खेळण्याचा सण म्हणजे रंगपंचमी. होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी, काही प्रांतांत हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो.आपल्याकडे होळी नंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. तर काही ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशीही रंगपंचमी साजरी करतात. आज भारतामध्ये हा सण अत्यंत उत्साहाने, आनंदाने साजरा करतात.
पूर्वी फक्त काही प्रांतापुरता मर्यादित असलेला हा सण आता मात्र सर्व भारतभर अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. पूर्वी या सणाला फार प्रतिष्ठा होती. राजे, महाराजे आपल्या उद्यानातून, राजवाड्यातून सर्वांसह रंगपंचमी साजरी करीत असत.
या दिवशी लोक एकमेकांच्या अंगावर, डोक्यावर वेगवेगळ्या रंगाची उधळण करून आनंदात नाचतात. पूर्वी आणि आताही सर्व लोकांनी एकत्र येऊन काही काळ आपल्या अडचणी, दुःख विसरुन रंगात भिजून आनंद घ्यावा हीच या सणामागची भावना होय.तसेच हा सण कोणीही कोणाला रंग लावून आपण सर्व समान आहोत याचा संदेश देतो. भेदाभेद विसरुन, सामाजिक एकात्मता साधणे, बंधुभाव वाढीस लावून सर्वांनी एकमेकांसह पुढील वाटचाल करणे हाच खरा रंगपंचमी या सणामागील संदेश होय.
रंगपंचमी 10 ओळी मराठी निबंध| Rang panchami essay in Marathi
1.रंगपंचमी हा सण फाल्गुन वद्य पंचमीला महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण आहे.
2.एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो म्हणून फाल्गुन वद्य पंचमीला 'रंगपंचमी' हे नाव प्राप्त झाले आहे.
3.यादिवशी सर्व भेदभाव विसरून लहान थोर एकत्र येतात व आनंदाने रंगांचा सण साजरा करतात.
4.मराठेशाहीच्या काळात देखील सरदार वगैरे प्रतिष्ठित मंडळी रंगपंचमी साजरी करत असत.
5.काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी 'बगाड़' घेण्याची पद्धत आहे.
6.लहान मुले पिचकारी घेऊन दिवसभर एकमेकांवर रंग उडवण्यात मग्न असतात.
7.होळी नंतर आणि गुढीपाडव्याच्या अगोदर येणाऱ्या रंगपंचमी सणाची लोक आतुरतेन वाट पहात असतात.
8.मानवी जीवनात जर रंग नसतील तर ?जीवन किती उदास वाटल ना? आपल्या जीवनातील रंगांचे महत्त्व अधोरेखित करणारा सण म्हणजे रंगपंचमी.
9.नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी साजरी केल्यास डोळे व त्वचेला इजा होण्याची शक्यता कमी असते.
10.भेदभाव, वैरभाव, मतभेद सर्व दूर करून मानवी जीवनात आनंदाचे रंग उधळणारा सण म्हणजे रंगपंचमी.
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1) रंगपंचमी सन कधी साजरा केला जातो?
Ans होळी च्या दुसऱ्या दिवशी हा सन साजरा केला जातो.
Q.2)या वर्षी हा सण कधी साजरा केला?
Ans या वर्षी हा सण 7 मार्च ला साजरा केला जातो.