Type Here to Get Search Results !

गुढीपाडवा माहिती मराठी | Gudi Padwa Mahiti in Marathi

गुढीपाडवा माहिती मराठी |गुडी पाडवा माहिती निबंध मराठी Gudi Padwa Mahiti in Marathi | Gudi Padwa information in Marathi 


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण गुढीपाडवा या सना बद्दल संपुर्ण माहिती निबंध बघणारा आहोत हे तुम्हाला नक्कीच आवडेल.या वर्षी गुढी पाडवा 22 मार्च बुधवार या रोजी सर्व देशभरात साजरा केला जाणारा आहे.

गुढीपाडवा माहिती मराठी | Gudi Padwa Mahiti in Marathi 

    आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी एक आहे गुढी पाडवा. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो. या दिवशी गुढया, तोरणे उभारण्याची परंपरा खजल्याने या सणाला 'गुढीपाडवा' असे म्हटले जाते. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा होतो.

      असे म्हटले जाते की याच दिवशी ब्रम्हदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. या सृष्टीतील सर्व देवी देवतांना पूजन्याचा हा दिवस आहे. या दिवशी सर्वजण सकाळी उठून अंघोळ करतात, घरापुढे रांगोळी काढतात, दाराला फुलांची तोरण बांधतात, सर्वजण पारंपारिक वस्त्र परिधान करतात, पंच पक्वान बनवतात त्यानंतर दारासमोर गुढी उभारतात. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. सर्वजन गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करतात. 
    महाराष्ट्रात हा सण घरोघरी साजरा होतो. या दिवशी सर्वत्र प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण असते. गुढी हे सुख, समृद्धीचे प्रतीक असते. घरातील शांती, सुख, समृद्धी अशीच कायम राहावी त्यासाठी सर्वजण घरी गुढी उभारतात.प्रत्येक सणाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते तसेच गुढीपाडव्याचे सुद्धा आहे. भारतीय संस्कृती जपणे व एकमेकांवर प्रेम करणे हे या सणाचे उद्दिष्ट आहे.


 हे पण वाचा ⤵️ 

FAQ
Q.1) या वर्षी गुढीपाडवा कधी साजरा केला जाणार ?
Ans - या वर्षी गुढी पाडवा 22 मार्च बुधवार या रोजी सर्व देशभरात साजरा केला जाणारा आहे.

Q.2) या दिवशी ब्रह्मदेवाने काय केले होते?
Ans- या दिवशी ब्रम्हदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती.

Q.3) गुढीपाडवा हे कशाचे प्रतीक मानले जाते?
Ans -गुढी हे सुख, समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad