राम नवमी 2023 | राम जन्माचा पाळणा मराठी| Ram janmacha palana Marathi | ram navami 2023
राम नवमी 2023: राम नवमी हा सन भगवान विष्णूचा सातवा अवतार प्रभू रामचंद्र यांचे जयंती म्हणून श्री रामनवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाचा नऊवा दिवस प्रभु श्रीरामचंद्र यांचा जन्म दिवस मानला जातो. या दिवशी रामायणातील विविध कथांचे व वैयक्तिक तसेच सामूहिक पठण केले जाते विविध ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी जमतात.
यावर्षीचा रामनवमी हा सण मार्च महिन्यात 30 तारखेला गुरवार येत आहे. या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म सोहळा संपन्न होत असतो म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत श्रीराम जन्माचा पाळणा हा पाळणा तुम्हाला या दिवशी नक्की उपयोगी पडेल.
➡️गुढीपाडवा शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी
राम जन्माचा पाळणा मराठी| Ram janmacha palana Marathi | ram navami 2023
पहिल्या दिवशी बोलली लिला
दशरथ राजाला पुत्र हो झाला
कौसल्या मातेने झोका हा दिला
जो बाळा जो जो रे जो ॥१॥
दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे
जशी खुलली कळी कमळाची
प्रसूत झाली त्या वेळेशी
जो बाळा जो जो रे जो ॥२॥
तिसऱ्या दिवशी वदली गंगा
नका बायांनो हो करु दंगा
दशरथ राजाला जाऊनी सांगा
जो बाळा जो जो रे ॥३॥
चवथ्या दिवशी वदली उमा
बाळाच्या रुपाची लागेना सीमा
ऐसी बोलली महादेव भीमा
जो बाळा जो जो रे जो ॥४॥
पाचव्या दिवशी पाची कल्लोळ
बाळ जन्मले रुप सावळ
राम निघाला रावणाचा काळ
जो बाळा जो जो रे जो॥५॥
सहाव्या दिवशी बोलली तारा
आला सोनार आपुल्या घरा
बाण धनुष्य रामाला करा
जो बाळा जो जो रे ॥६॥
सातव्या दिवशी धनुष्य टाकिले
लक्ष्मण अवतार शोधिले
यातून एक युग लोटले
जो बाळा जो जो रे जो ॥७॥
आठव्या दिवशी सखी वदली
सीता रामाची रावणाने नेली
मारुतीरायाने लंका जाळली
जो बाळा जो जो रे जो॥८॥
नवव्या दिवशी बोलली भागा
बायांनो तुम्ही चरणांशी लागा
दान चुड्याचे रामाला मागा
जो बाळा जो जो रे जो॥९॥
दहाव्या दिवशी बोलला गजा
संगे घेऊन वानर फौजा
बिभीषणा केला लंकेचा राजा
जो बाळा जो जो रे जो।।१०।।
अकराव्या दिवशी अकरावा रंग
ब्रम्हा विष्णूला लागला छंद
पाचही हत्यारे रामाच्या संग
जो बाळा जो जो रे जो।।११।
बाराव्या दिवशी जना बोलली
लक्ष्मणाला शक्ती लागली
पहाड आणाया गेला मारुती
जो बाळा जो जो रे जो ॥१२॥
तेराव्या दिवशी नंदीवर बसले
रामाने मारुतीला स्वराज्य दिले
देशोदेशी वानर धाडिले
जो बाळा जो जो रे जो ॥१३॥
चौदाव्या दिवशी कहाणी सारी
बिजली बत्तीचा प्रकाश भारी
तेहतीस कोटी देव जमले दरबारी
जो बाळा जो जो रे जो ॥१४॥
पंधराव्या दिवशी अवतार बदले
कृष्ण पांडव पुढे निघाले
कंस मामाला त्यांनी वधिले
जो बाळा जो जो रे जो ॥१५॥
सोळाव्या दिवशी सोळावा केला
गुरु वसिष्ठ विद्या बोलला
धन्य रामाचा पाळणा गाईला
जो बाळा जो जो ॥१६॥
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1) यावर्षी राम नवमी कधी साजरी केली जाणार आहे?
Ans.यावर्षीचा रामनवमी हा सण मार्च 30 तारखेला गुरवार या रोजी साजरा केला जणारा आहे.
Q.2)श्री रामनवमी का साजरी केली जाते?
Ans.भगवान विष्णूचा सातवा अवतार प्रभू रामचंद्र यांचे जयंती म्हणून श्री रामनवमी साजरी केली जाते.
Q.3) श्री राम हे भगवान विष्णूचे कितवे अवतार आहेत?
Ans.भगवान विष्णूचा सातवा अवतार प्रभू रामचंद्र हे आहेत.