छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण निबंध मराठी | Chatrapti shivaji maharaj Jayanti speech essay in Marathi
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत हे आपल्याला वेगवेगळ्या शाळेतील निबंध स्पर्धा व भाषण या साठी हि माहिती आपल्याला अतिशय उपयोगी पडेल तरी आपण ही माहिती शेवट पर्यंत वाचावी ही नंब्र विनंती.
➡️दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी - परीक्षा केंद्रावर उशिरा आल्यास प्रवेश मिळणार नाही
➡️राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी माहिती भाषण निबंध
छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी | Chatrapti shivaji maharaj Jayanti speech in Marathi
प्रौढ प्रताप पुरंदर।
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज
श्रीमंत योगी । श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज की जय |
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय ।
जय जिजाऊ जय शिवराय ।
जय जिजाऊ जय शिवराय ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पशनि पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार.
महाराष्ट्राचे आधी दैवत, भूपती, नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, जगविख्यात, विश्ववंदनीय, राजाधिराज, योगिराज, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.
छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सर्रकन काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो. आज मी येथे अशा एका महान महापुरुषांची गाथा उलगडणार आहे. ज्यांचा मला, तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे.
विजेसारखी तलवार चालवुन गेला
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडुन गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.
आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. : 'कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे. कोण होते हे शिवाजी ? असे कोणते काम त्यांनी केले होते ? की आज साडेतीनशे वर्षे उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो.
इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते ? तर ते सांगतील.
रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता
रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता
विचारात्या सह्याद्रीला
आणि विचारात्या सागरी लहरींना
माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता.
खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की, त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे.
छ- छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र- त्रस्त मोगलांना करणारे
प- परत न फिरणारे
ती- तिन्ही जगात जाणणारे
शि- शिस्तप्रिय
वा- वाणिज तेज
जी- जिजाऊ चे पुत्र
म- महाराष्ट्राची शान
हा- हार न मानणारे
रा- राज्याचे हितचिंतक
ज- जनतेचा राजा
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
कोणे एके काळी आम्ही जनावरासारख जीवन जगत होतो. आमचा आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच; पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. जनावर आणि माणसं तर दूरच पण इथल्या मंदिरातील देव देखील येथे सुरक्षित राहिला नव्हता.
याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा, भवानी, रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी या महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या. त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे.
अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१. १९ फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊ ची पुण्याई आली होती फळाला
कारण जनतेचा पोशिंदा
राजा शिवबा जन्मला
अरे, माझा राजा जन्मला
माझा शिवबा जन्मला
दीन-दलितांच्या कैवारी जन्मला
दुष्टांचा संहारी जन्मला
अरे माझा राजा जन्मला
माझा शिवबा जन्मला.
शिवबांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले.
जर कोणी चुकत असेल
तर त्याला सत्याची वाट दाखवा
आणि जर कोणी नडत असेल
तर त्याला मराठ्याची जात दाखवा.
अशी शिकवण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेली. भोळ्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोण त्यांनी शिवरायांसमोर मांडला.
म्हणूनच म्हणावेसे वाटते.
थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाव न मिटणार.
अशा या वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र? कसा असेल तो राजा?कसे असेल ते राज्य ? आणि कसे असतील ते छत्रपती ? अहो,
शिवछत्रपती म्हणजे- मावळ्यांचा मेळ
शिवछत्रपती म्हणजे- मनगटातले बळ
शिवछत्रपती म्हणजे- तलवारीची धार
शिवछत्रपती म्हणजे- छातीवरचा वार
शिवछत्रपती म्हणजे- मनामनातले धैर्य
शिवछत्रपती म्हणजे- सह्याद्रीचे शौर्य
शिवछत्रपती म्हणजे- जिजाऊंचे पुत्र
शिवछत्रपती म्हणजे- व्यक्ती नसून एक विचार आहे.
व्यक्ती नष्ट होतात; पण विचार कधीही नष्ट होत नाहीत आणि अशा या विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी.मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवेला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली. त्यांनी सह्याद्रीच्या कडे-कपारीत भटकंती करून सवंगडी गोळा केले. तानाजी, येसाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हर हर महादेव अशी गर्जना आसमंतात घुमली आणि वयाच्या सोळाव्या वर्षी पासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला.
एक होते शिवाजी, भिती नव्हती त्याना जगाची चिंता नव्हती परिणामाची कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊची त्यांची जात होती मर्द मराठ्यांची देशात लाट आणली भगव्या झेंडयाची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात.
जय जिजाऊ, जय शिवाजी।
जय जिजाऊ, जय शिवाजी।
शिवरायांनी आपले शौर्य, कल्पकता, संघटन कौशल्य, राज्यधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य आदि गुणांनी गेली अनेक शतके पारतंत्र्यात बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले.
हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद
हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद
धन्य-धन्य हा महाराष्ट्र धन्य आपले महाराज
आज साडेतीनशे वर्षे होऊनही महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार यांची प्रेरणा ताजीच आहे.
इतिहास विसरणारी माणसे
इतिहास घडवू शकत नाहीत
आणि इतिहास घडविणारी माणसे
इतिहास कधीच विसरू शकत नाहीत
हा ही एक इतिहासच आहे.
निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास यांच मातीत शिवरायांनी घडविला.
घेऊन मुठभर मावळे आनं निधडी छाती
सोडून सारे ऐश्वर्य लढलास तु या मातीसाठी
विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती
तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती
तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती.
मित्रांनो, आजच्या या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बाणण्याची. शिवरायांचा इतिहास जपण्याची. गड-किल्ल्यांचे रक्षण करण्याची. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची. परस्त्रीला मातेसमान मानून तिचे रक्षण करण्याची जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती. शिवछत्रपतींची जयंती.
जाता जाता मी एवढंच म्हणेन,
तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे
तानको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे
शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे शिवशाहीची सारी तत्त्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे..
शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपविते.
छत्रपती शिवाजी महाराज की... जय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की..... जय स्वराज्यजननी जिजामाता की...... जय
हे पण वाचा ⤵️
➡️डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध मराठी माहिती
➡️जागतिक एड्स दिवस 2022 मराठी भाषण निबंध
➡️इ 10 वी साठी सराव प्रश्नपेठी 2022
➡️महात्मा ज्योतिबा फुले 15+ अनमोल विचार मराठी
➡️महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध 2022
➡️संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
➡️जागतिक एड्स दिवस 2022 मराठी भाषण निबंध
➡️इ 10 वी साठी सराव प्रश्नपेठी 2022
➡️महात्मा ज्योतिबा फुले 15+ अनमोल विचार मराठी
➡️महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध 2022
➡️संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
FAQ
Q.1) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म कधी झाला?
Ans.19 फेब्रुवारी 1630 या रोजी झाला.
Q.2)छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
Ans.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते.