Type Here to Get Search Results !

जागतिक मराठी भाषा दिन 2023 | मराठी राजभाषा दिन मराठी माहिती | Marathi Raj Bhasha din information in Marathi

जागतिक मराठी भाषा दिन 2023 | मराठी राजभाषा दिन मराठी माहिती | Marathi Raj Bhasha din information in Marathi 

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो व माझ्या गुरुजन वर्ग 
आज आपण जगातील मराठी भाषा दिवस (Raj bhasha din information in Marathi) साजरा करणार आहोत. पण आपल्याला हे पण माहीत असन गरजेचं आहे की आपण मराठी राज भाषा दिवस का साजरा करतो, कष्या प्रकारे साजरा केला जातो याबद्दल आपण थोडक्यात मराठी माहिती बघनार आहोत या मराठी भाषा दिनाच उपयोग आपन मराठी भाषा निबंध भाषण या स्पर्धेत उपयोग करू शकतो व तसेच  सूत्रसंचलन मध्ये चारोळ्या कविता मध्ये उपयोग करू शकतो तरी आपण ही माहिती शेवट पर्यंत वाचावी.

जागतिक मराठी भाषा दिन 2023 भाषण| Marathi Raj Bhasha din information in Marathi 



मोडेल पण वाकणार नाही महाराष्ट्राचा बाणा आहे, पोलादी आमची छाती आणि ताठ आमचा कणा आहे,
मरणाला जुमानात नाही शिवशंभुचा माथी हात आहे,
महाराष्ट्र आमचा धर्म आणि मराठी आमची जात आहे,

       माझ्या सर्व भाषा बंधूंना सप्रेम नमस्कार इसवी सनाच्या बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी जी भाषा रुजविली. संत नामदेव, तुकाराम, गोरोबा कुंभार, सावतामाळी नरहरी सोनार, यांसारख्या संतांनी जी भाषा जगविली छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली आणि कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, पुल देशपांडे, प्र के अत्रे अशा साहित्यिकांनी ची भाषा वाढविली त्या मराठी भाषेचा गौरव दिन आज आपण साजरा करीत आहोत.

       दिनांक 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी महाराष्ट्राच्या मातीत एक तेजपुंज तारा जन्माला आला. असामान्य प्रतिभा आणि विलक्षण शब्द सामर्थ्याच्या जोरावर या सारस्वताने मराठी भाषेतून साहित्य निर्मिती केली माता सरस्वतीच्या देवळातील सर्वात तेजस्वी रत्न म्हणून ज्या साहित्यिकाला गौरवलं गेलं ते महान शब्दप्रभू कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करीत असतो.

       मराठी भाषेला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे महान साहित्यिक विस खांडेकर यांनी 1942 साली कुसुमाग्रजांची काव्यप्रतिभा ओळखून त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला आणि याच विशाखा काव्यसंग्रहाने मराठी भाषेला दुसऱ्या ज्ञानपीठ मिळवून दिलं. अगदी शिधा पत्रिके पासून तर विद्वानांच्या चर्चासत्रापर्यंत आणि शाळेतील मराठीच्या पुस्तकापासून तर विदेशातील प्रतिष्ठित ग्रंथालयापर्यंत कुसुमाग्रजांचे साहित्य पोहोचलं आहे.

➡️राम जन्माचा पाळणा मराठी

      पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तर गौरवाने म्हणायचे की आमचा जन्म हा विशाखा नक्षत्रावर झालेला आहे. एवढा प्रभाव या साहित्यिकाचा आणि त्याच्या कवितांच्या जनमाणसांवर होता. वि स खांडेकर यांनी कुसुमाग्रजांना मानवतेचे कवी म्हंटले आहे. या महान साहित्यिकाने मराठी भाषेच्या प्रतिष्ठेत जी भर घातली त्याच साठी त्यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.. मोडूल पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवती हात ठेवून नुसतं लीट म्हणा अशी लढण्याची उर्मी देणारे कुसुमाग्रज मराठी माणसाच्या मनामनात वसलेले आहेत. आज मराठी भाषिक लोक नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त संपूर्ण विश्वात पसरलेले आहेत. जगात दहा कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषणाच्या क्रमवारीत मराठीचा दहावा क्रमांक लागतो ही मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला संस्कृतीतून साहित्यातून मराठी भाषेचा संपत्र वारसा दिलेला आहे. तो टिकविणे आणि वाढविणे हे आपल्याण पिढीचे कर्तव्य नाही काय.

      हिंदीचा योग्य तो मान राखून आणि इंग्रजी आत्मसात करून आपण मराठीचा झेंडा रोवायलाच हवा कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर प्रगती होते हे जपान सारख्या देशाने आपल्याला दाखवून दिले आहे. मराठी भाषा दिन साजरा करताना आपली मायबोली ही दिन होणार नाही याचा आपण प्रयत्न करायलाच हवा मराठी भाषा टिकली तरच मराठी दूरचित्रवाहिन्या, साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत यांना वाचक आणि प्रेक्षक लाभतील.

आजच्या या मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी आपण सर्व मराठी बांधव संकल्प करुयात मराठीतूनच बोलूयात, मराठी पुस्तकं वाचुयात, मराठीतूनच लिहूयात, मुलांना मराठी भाषा शिकवूयात आणि माय मराठीचे पांग फेडूयात कारण मराठी ही फक्त आपली भाषा नही तर मराठी आपली एक मात्र आशा आहे.

            ! जय हिंद, जय महाराष्ट्र!



हे पण वाचा ⤵️

FAQ
Q.1) मराठी भाषा दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans- दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, भारत आणि जगभरात “मराठी भाषा दिन” किंवा “मराठी दिवस” साजरा केला जातो. 

Q.2) मराठी राज भाषा दिन का साजरा केला जातो ?
Ans - प्रसिद्ध मराठी लेखक - कुसुमाग्रज यांची जयंती निमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, भारत आणि जगभरात “मराठी भाषा दिन” किंवा “मराठी दिवस” साजरा केला जातो. 

Q.3)मराठी राजभाषा गौरव दिन कोणाचा जन्मदिवस आहे?
Ans - कुसुमाग्रज' म्हणून महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध असलेले मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिनी असतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad