संत गाडगेबाबा पुण्यतिथी भाषण मराठी |गाडगेबाबा पुणयतिथी 2022 भाषण मराठी | sant gadge baba punyatithi bhashan marathi | Sant gadge Baba punyatithi speech in Marathi
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण संत गाडगेबाबा यांच्या विषयी माहिती बघणारा आहोत त्यांनी त्यांच्या जीवनातील कार्य संघर्ष त्यांचे अनमोल विचार हे आपण मराठीत माहिती बघणारा आहोत.
संत गाडगेबाबा पुण्यतिथी भाषण मराठी | sant gadge baba punyatithi bhashan marathi
असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगे बाबा. गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी राहत होते. त्यांचे बालपण मामाकडे गेले.
डोक्यावर विस्कटलेले केस, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. डेबूजीच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. डेबूजी लहान असताना त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मन्यमुखी पडले.
त्यामुळे डेबुजीच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजीचे लग्न लहानपणी झाले होते. त्यांना चार मुली होत्या पण ते संसारात फारसे रमले नाही. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
गाडगेबाबांनी दिनांक ११ फेब्रुवारी १९०५ रोजी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे.
अंगावर गोधडीवजा फाटके तुकडे कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयष्य वेचले.
➡️मकर संक्रांतीचे उखाणे मराठी 2022
➡️ मकर संक्रांत मराठी माहिती निबंध
➡️मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल उखाणे मराठी
यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.
देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
Q.1)गाडगेबाबा यांचा जन्म कधी व कुठे झाला होता?
Ans.गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला.
Q.2)गाडगेबाबांनी संन्यास कधी स्वीकारला?
Ans.गाडगेबाबांनी दिनांक ११ फेब्रुवारी १९०५ रोजी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
Q.3) गाडगेबाबांचा वेश कसा होता?
Ans.अंगावर गोधडीवजा फाटके तुकडे कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे.