डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध मराठी माहिती | Dr.babasaheb ambedkar mahaparinirvan din bhashan nibandh in Marathi
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण भारतरत्न,भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री व दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन तर आपण आज त्यांच्याबद्दल संपुर्ण माहिती निबंध मराठी माहिती भाषण बघणारा आहोत ते तुम्हाला नक्की कामी येईल
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती | Dr.babasaheb ambedkar mahaparinirvan din bhashan in Marathi
भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले. त्याच्या दुस-या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौध्द पध्दतीने अंतिम संस्कार करण्यात आले. पुढे काही वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध हा धर्म स्विकारला होता. त्यांना लोक 'बोधिसत्व' मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप परिश्रम घेतले. अस्पृश्यता संपवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच ते बौद्ध गुरू मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'बौद्ध संकल्पने- ''मधील' 'महापरिनिर्वाण' हा शब्द घेण्यात आला आहे..
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. जगभरातूनही अनेक लोक आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून त्यांच्या स्मृतीसअभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेज मधून, शासकीय कार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक जण अभिवादन करतात.
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन, दर्शन यांचे थेट प्रक्षेपण सोशल मिडीयाच्या विविध माध्यमा- तून ऑनलाईन पुरवले जाते. याचा लाभ घरबसल्याही सर्वजण घेतात.
➡️जागतिक एड्स दिवस 2022 मराठी भाषण निबंध
➡️इ 10 वी साठी सराव प्रश्नपेठी 2022
➡️महात्मा ज्योतिबा फुले 15+ अनमोल विचार मराठी
➡️महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध 2022
➡️संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
Q.1)भारतीय संविधानाचे शिल्पकार कोन आहेत?
Ans.भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आहेत.
Q.2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कधी झाले?
Ans. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले.
Q.3)डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध हा धर्म कधी स्विकारला होता?
Ans.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध हा धर्म स्विकारला होता.