Type Here to Get Search Results !

मार्गशीर्ष गुरुवार पुज्या करण्याची योग्य पद्धत | Margashirsha Guruvar Vrat yogya paddhat

मार्गशीर्ष गुरुवार पुज्या करण्याची योग्य पद्धत |मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे |Margashirsha Guruvar Vrat yogya paddhat 

मार्गशीर्ष गुरुवार पुज्या करण्याची योग्य पद्धत

        नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण आपण मार्गशीर्ष महिन्यात गुरवारी देवीची पूजा करतो.अप आपल्याला माहिती नसते पुज्या कशी केली पाहिजे त्यांची योग्य पद्धत त्यामुळे मी आपल्या पूज्या कश्या पद्धतीने करायला पाहिजे ही माहिती खालीप्रमाणे दिली आहे.

मार्गशीर्ष गुरुवार पुज्या करण्याची योग्य पद्धत | Margashirsha Guruvar Vrat yogya paddhat 


1.पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.

2.रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा.

3.चारीबाजूला रांगोळी काढावी. 

4.चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे.

5.त्यावर हळद-कुंकू वाहावे.

6.पाण्याच्या तांब्यात दूर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा.

7.कलशाला बाहेरून हळद- द-कुंकवाचे बोटं लावावे.

8.तांब्याच्या आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा. 

9.कलश चक्राकारावर ठेवावा.

10.समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. 

11.लक्ष्मीसमोर दिवा लावावा.

12.लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी.

13.फळ, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा.

14.देवीला कमळाचे फूल अर्पित करावे.

15.लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती
करावी. 
16.श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे.

17. व्रत कथा वाचावी. मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी.
18.संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे.

19.गायीसाठी एक पान वेगळं काढावे.

20.नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे.

21.दुसर्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्या झाडाला घालावे.

22.पाने घरातील चारी बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे.

     शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा.

हे पण वाचा ⤵️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad