मकर संक्रांतीचे उखाणे मराठी | मकर संक्रांति मराठी उखाणे | Makar sankranti che ukhane in Marathi | मकर संक्रांतीचे स्पेशल उखाणे | Makar sankran popular ukhane|
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मकर संक्रांत हा सण सर्व देशभरात 15 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. मकर संक्रांत हा महिलांचा अतिशय आनंदाचा सन म्हणाल तर चालत आणि नवीन वर्षाचा पहिला सण हा मकर संक्रांत आहे त्यामूळे सर्व महिला हा सन खुप अवडीन साजरा करतात.या दिवशी सर्व महिला एकत्र येतात आणि एकमेकींना वान देतात व हळदीकुंकाचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशी ठेवतात. मकर संक्रांतीच्या दिवशी महिला उखाणे घेतात ही आपल्या इकडे प्रथा आहे. मग ती नवीन नवरी असो की सुवसनी स्त्री असो तिला मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन उखाणे घ्यावेच लागतात. त्यासाठी मी तुमच्या करिता मकर संक्रांतीचे नवीन नवीन उखाणे घेउन आलेलो आहे. आवडल्यास शेअर आणि कमेंट नक्की करा.तर चला उखाण्याला सुरवात करू
➡️ मकर संक्रांत मराठी माहिती निबंध
⚛️मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल उखाणे मराठी
मकर संक्रांतीचे उखाणे मराठी| Makar sankranti ukhane in Marathi
मकर संक्रांतीच्या स्त्रियांचे हळदी कुंकवाचे उखाणे
" संक्रातीच्या दिवशी, तिळाचे काढते सत्व,...रावांचे नाव घेते, आज हळदी कुंकवाचे महत्व."
"संक्रातीच्या दिवशी, पतंग उडवतात आकाशात,_ रावांच्या सहवासाने, सुख आले जीवनात."
"तिळाची माया, गुळाची जोडी,परमेश्वर सुखी ठेवो, __ आणि___ ची जोडी."
"आली आली संक्रांत, घ्या सौभाग्याच वाण,_ राव आहेत प्रेमळ, जशी आनंदाची खाण."
"महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज,....रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज."
"एका आठवड्यात, दिवस असतात सात....रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत."
➡️महात्मा ज्योतिबा फुले 15+ अनमोल विचार मराठी"मकर संक्रांति म्हणून, ठेवला आहे मी उपवास,___ रावांचे नाव घेते, आयुष्यभर असुदे त्यांचा सहवास."
➡️महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध 2022
"आज मकर संक्रांत म्ह्णून, मी आले नटून,_____ आणि_____ ची जोडी दिसते, सर्वात उठून."
" देवापुढे ठेवण्यासाठी आणले, नारळ आणि केळी,___रावांचे नाव घेते, मकरसंक्रातीच्या वेळी."
"काकवी पासून, बनवतात गुळ,___ रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ."
"लग्नानंतर आज आहे, आमची पहिली संक्रांत,___ रावांचे नाव घेते, सुख समृद्धी येउदे आमच्या संसारात."
"पुराणपोळीला स्वाद येण्यासाठी, घालतात त्यात गुळ,____ रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ."
"गुळाने येतो, लाडूला गोडवा,___ रावांचे नाव घेते, आज सर्वांना संक्रातीला बोलवा."
"संक्रांत आहे म्हणून, साऱ्या आल्या नटून,___ माझी दिसते, सर्वात उठून."
"आई वडिलांसारखी माया, नसते कोणाला,___ रावांचे नाव घेते, संक्रांतीच्या सणाला."
" संक्रातीच्या दिवशी, महिला जमल्या हळदी कुंकवाला,___ रावांचे नाव घेऊन, आली मी तुमच्या स्वागताला."
"नवीन वर्षाची सुरवात झाली, संक्रांतीपासून,___ रावांसोबत सर्व सण साजरे करेन, आजपासून."
"तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,___ रावांचे नाव घेते, सर्वांनी कान आणि डोळे खोला."
"आईच्या हाताचे तिळाचे लाडू, खायला येते खूप मज्जा,___ रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा."
"आजच्या दिवशी, घरी जमल्या साऱ्या मावशी,___ रावांचं नाव घेते, मकरसंक्रांतीच्या दिवशी."
"मकर संक्रांतीला असतो, हलव्याच्या दागिन्यांना मान,___ रावांचे नाव घेऊन देते, हळदी कुंकूचे वाण."
"मराठ मोळे सण, आहेत किती छान,___ रावांची पत्नी असण्याचा, मला आहे अभिमान."
"तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,___ राव बोलतात कमी, तोंड खोला."
"तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,____ रावांचे नाव घेण्याचे, सौभाग्य मला."
"रामायण महाभारतात, बघितले असतील सर्वांनी बाण,____ रावांचे नाव घेते, घ्या संक्रांतीचा वाण."
"संक्रांतीच्या सणाला आहे, सुगड्यांचा मान,____ रावांच्या नावावर देते, हळदी कुंकूच वाण."
"आज मकरसंक्रांत म्ह्णून, जेवण केले आहे गोड,____ रावांची आहे, मला फार ओढ."
"तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,____ रावांचे नाव घेण्याचे, सौभाग्य मला."
"मराठ मोळे सण, आहेत किती छान,___ रावांची पत्नी असण्याचा, मला आहे अभिमान."
"तिळाचा लाडू, खायला येते मज्जा,___ रावांनी केला, माझ्या मनावर कब्जा."
" मकर संक्रांतीला, कपडे घालतात काळे,___ रावांना नेमही सुचतात, कुठेपण चाळे."
"आज मकरसंक्रांत म्ह्णून, जेवण केले आहे गोड,____ रावांची आहे, मला फार ओढ."
"मकर संक्रांतीला, लोक उडवतात पतंग,___ रावांची आवड आहे, सत्संग."
"आज मकरसंक्रांत म्हणुन, दाराला लावले तोरण,___ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचे कारण."