जागतिक एड्स दिवस 2022 मराठी भाषण |6 डिसेंबर जागतिक एड्स दिवस मराठी माहिती|6 disembar world aids day | world aids day information in marathi.
जागतिक एड्स दिवस 2022: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज 1 डिसेंबर हा दिवस सर्व जगभरात साजरा केला जातो.तर आपण एड्स या रोगाबद्दल माहिती जाणून घेऊया ही माहिती आवडल्यास नक्की कामी पडल.
जागतिक एड्स दिवस 2022 मराठी माहिती निबंध मराठी | world aids day information in marathi.
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने (UNO-United Nations Organization) घोषित केले आहे. एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो.
ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांचा संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बन् व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला. एड्स' हा शब्द उच्चारायला आणि लिहायला अतिशय सोपा, मात्र हा रोग सोपा नाही.
➡️केंद्रीय विद्यालय मध्ये 13404 शिक्षक पदाची महा भर्ती
कुणाला ह्या रोगाची लागण झाली असे साधे माहिती जरी पडले तरीही अंगावर काटे उभे राहतात. पूर्वी कर्करोग हा सर्वांत भयानक रोग मानला जाई, मात्र 'एड्स' ह्या रोगाचा शोध लागल्यानंतर त्यालाच सर्वांत भयंकर रोग मानले जाऊ लागले. कर्करोगावर आता इलाज निघालेत देखील. चांगले उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कर्करोग बराही होऊ शकतो. मात्र, १९८१ साली एड्सच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाल्यानंतर आजतागायत ह्या रोगावर इलाज, औषध, लस किंवा हा रोग पळवून लावणारी उपचारपद्धती यांचा शोध अद्याप लागला नाही. काही लोक तसा दावा जरी करत असले तरी त्यामागील सत्यता अजूनही बाहेर आलेली नाही. हा रोग संसर्गजन्य नाही. म्हणून एड्सबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याच्यासोबत हस्तांदोलन केल्याने, सोबत जेवण केल्याने हा रोग होत नाही. म्हणून एड्स बाधित रुग्णांना वाळीत टाकू नये.
त्यांच्या आयुष्याचे शेवटचे काही दिवस उरलेले असतांना त्यांना वाळीत टाकून आपण त्यांचे ह्या आजाराला तोंड देण्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरणच करतो. याव्यतिरिक्त आपण त्यांच्याशी सौदार्हाचे, स्नेहाचे संबंध ठेवले तर त्यांचे अखेरचे दिवस सुखात निघून जातील. काही शाळांमधून एड्स बाधित विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मज्जाव केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
एड्स विषयी आजपर्यंत झालेली जनजागृतीमुळे एड्सच्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र असे म्हणून गाफील राहून चालणार नाही. म्हणूनच वरील माहिती कित्येकांना ठाऊक जरी असली तरीही सतर्क रहा ! सुरक्षित रहा !
Q.1)जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो?
Ans.जागतिक एड्स दिवस 1डिसेंबर ला साजरा केला जातो.
Q.2)जागतिक एड्स दिन प्रथम कधी व कोणी साजरा केला?
Ans.जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बन् व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला.
Q.3)एड्स या रोगांवर काही उपचार आहे का?
Ans.ह्या रोगावर इलाज, औषध, लस किंवा हा रोग पळवून लावणारी उपचारपद्धती यांचा शोध अद्याप लागला नाही.