Type Here to Get Search Results !

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी मराठी भाषण 2022 | mahatma jyotiba phule punyatithi quotes in marathi

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी मराठी भाषण 2022 |महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण pdf | mahatma jyotiba phule punyatithi quotes in marathi |Mahatma jyotiba phule speech in Marathi 


महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी मराठी भाषण 2022

महात्मा ज्योतिबा फुले: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज महात्मा ज्योतिबा फुले यांची  पुण्यतिथी आहेतर आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिंवतीला शेक्षणिक कार्य त्यांच्या विषय माहिती सुध्दा बघनार आहेत माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.

➡️महात्मा ज्योतिबा फुले 15+ अनमोल विचार मराठी
➡️महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध 2022

महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती| Mahatma jyotiba phule information in Marathi


महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यास आरती !
नमन माझे महात्मा फुलेस आज आहे पुण्यतिथी !!

        सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले असे होते. ते एक लेखक, विचारवंत आणि थोर समाजसुधारक होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्हयातील कटगुण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटीश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घितला. अभ्यासात खूप हुशार असल्याने पाचसहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
      महात्मा फुले यांच्यावर 'थॉमस पेन' यांच्या 'राईट ऑफ मॅन' या पुस्तकाचा प्रभाव पडला.त्यांनी विषमता दूर करण्यासाठी स्त्री-शिक्षण व मागासलेल्या मुलां-मुलींचे शिक्षण यावर भर दिला. 
     १८४८ मध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणिशिकविण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी पार पाडली.

“घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते."
"ज्ञान ही एक शक्ती अहि" 
"नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे "
असे विचार जोतीरावांनी मांडले.


        समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचविण्या साठी महात्मा फुलेंनी 'सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 'शेतकऱ्यांचा आसूड' हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. समाजातील वाईट प्रथा त्यांनी नष्ट केल्या.समाजातील लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास वाढवला. त्यांना हक्कांची अधिकारांची जाणीव करून दिली. २८ नोव्हेंबर १८९० साली जीतीरावांचा मृत्यू झाला. त्यांचे कार्य समाजात प्रेरणादायी आहे.

जाता जाता एवढंच म्हणेन

मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा !
लाविला त्यांना शिक्षणाचा लळा !!
भिडेवाड्यात खुलविला फुले दांपत्यानी शिक्षणाचा मळा !!
अश्या प्रकारे आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यिथीनिमित्त त्यांची सर्व माहिती मराठीत बघितल आणि त्यांच्या जीवनातील कार्य, शेक्षणीक कार्य बघितले माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.


हे पण वाचा ⤵️


हे पण वाचा⤵️


FAQ 
Q.1) महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी व कुठे झाला ?
Ans.त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्हयातील कटगुण येथे झाला. 

Q.2) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आई वडिलांचे नाव काय आहे?
Ans.त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते.

Q.3)महात्मा फुले यांच्यावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव पडला होता ?

Ans.महात्मा फुले यांच्यावर 'थॉमस पेन' यांच्या 'राईट ऑफ मॅन' या पुस्तकाचा प्रभाव पडला.

Q.4) महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी चालु केली ?

Ans.१८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा काढली व चालू केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad