महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध माहिती मराठी २०२२ | Mahatma fule Marathi bhashan mahiti nibandh 2022 | Mahatma phule speech in marathi
नमस्कार विध्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्धल मराठी माहिती भाषण निबंध आणि सूत्रसंचालन व कविता , चारोल्या (Mahatma fule Marathi speech pdf) महात्मा ज्योतिबा फुले यांचे शेक्षनिका कार्य, जीवनकार्य हे आपण मराठीत सर्व बघणार आहोत याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.तर मग आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भाषणाला सुरूवात करू.
महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण Marathi | Mahatma fule Marathi bhashan
नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठावरील सर्व गुरूजन वर्ग आणि सर्व माझ्या बंधू-भगिनींना आज मी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगणारं आहे तर ती तुम्ही शांत चीताने एकावी ही माझी नम्र विनंती आहे.
'विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नितीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शुद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
अशा स्पष्ट शब्दात शिक्षणाचे महत्व विशद करणारे क्रांतिसूर्य, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिल ही जयंती. त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला.बहुजन समाजातील अज्ञान, गरीबी पाहून समाज सुधारणेसाठी आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. समाजातील महिला निरक्षर राहिल्या तर समाज सुधारणा शक्यच नाही हे त्यांनी ओळखले.
महिलांना शिक्षणाचे द्वार उघडे व्हावे यासाठी त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली. मात्र या शाळेला काही लोकांनी कडाडून विरोध केला. फुले दाम्पत्याला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला गेला. मात्र महात्मा फुलेंना आपल्या जीवाची पर्वा नव्हती समाज सुधारणा कार्य करत असतांना मृत्यूसारख्या आव्हानालाही निडरपणे सामोरे जाणारे ते एक योद्धा होती.
महात्मा ज्योतिबा फुले चारोळी
दुःखी पीडितांचा दुःख हर्ता !
विद्येचा तो महान दाता !!
तहानलेल्यांचा त्यांनी तुप्त केला आत्मा !
म्हणुनी नाव त्यांचे पडले महात्मा !!
हे पण वाचा ⤵️
त्यांनी विविध लेखांतून आपले विचार अतिशय परखडपणे व निर्भयपणे मांडले. शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, ब्राम्हणांचे कसब या त्यांच्या ग्रंथामधून ज्योतिबांच्या तेजस्वी विचारांची प्रचिती येते. महिलांच्या शिक्षणासोबतच अस्पृश्यांचे शिक्षण व त्यांचे हक्क यासाठी देखील ज्योतिबांनी संघर्ष केला.
त्यांनी .. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विज्ञानवाद व समतावाद हा याचा पाया होता. त्यांनी देशातील तरुणांना निरोगी, सुंदर, मजबूत एकसंघ समाज उभा करण्याचे आवाहन केले. मानवता व समाजसेवा यापेक्षा अन्य कोणताही मोठा धर्म नाही असे ते नेहमी सांगत, प्रौढ शिक्षण, विधवा पुनर्विवाह तसेच बालहत्या प्रतिबंध अशा अनेक विषयांवर त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.
आधुनिक महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या जडणघडणीत महात्मा फुले यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा वाटा आहे. त्यांचे अतुलनीय कार्य पाहून १८८८ मध्ये जनतेने त्यांना 'महात्मा'" ही उपाधी दिली. अशा या महान युग पुरुषास शतदा नमन.
आणि जाताजाता एवढंच म्हणेन
स्त्रीशिक्षण व विधवा पुनर्विवाह सारखे कार्य केले !
दुःखी पीडितांचे तारणहार बनले !!
म्हणूनीच त्यांचे नाव जगती अजरामर झाले !!!
अश्या प्रकारे आपण आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी थोडक्यात माहिती निबंध मराठीत बघितल व तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे शेक्षनिक कार्य, जीवनकार्य बघितले माहिती आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा धन्यवाद.
हे पण वाचा ⤵️
हे पण वाचा⤵️
FAQ.
Q.1) महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुर्ण नाव काय आहे ?
Ans.त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते.
Q.2) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आई वडिलांचे नाव काय आहे ?
Ans. वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई हे होते.
Q.3) महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह कोणाशी झाला?
Ans.वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला.
Q.4) देशातील महिलांसाठी पहिली शाळा कधी व कुठे सुरू केले?
Ans.देशातील पहिली मुलींची शाळा १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली.