Type Here to Get Search Results !

धनत्रयोदशी माहिती मराठी | Dhantrayodashi Marathi Mahiti

धनत्रयोदशी माहिती मराठी|Dhantrayodashi Marathi Mahiti |धनत्रयोदशी माहिती मराठी 2022 pdf | Dhantrayodashi 2022 Information in Marathi 

धनत्रयोदशी माहिती मराठी

धनत्रयोदशी मराठी 2022: नमस्कार मित्रानो आणी मैत्रिणींनो या वर्षी धनत्रयोदशी ही 23 ऑक्टोबर ला आहे. तर आपण धनत्रयोदशी याबद्दल थोडक्यात माहिती बघू जसे की धनत्रयोदशी म्हणजे काय व का साजरी करतात. हे खालील लेखात दिलेले आहे ते तुम्ही शेवट परेंत वाचा.


धनत्रयोदशी माहिती मराठी|Dhantrayodashi Marathi Mahiti 

दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.

व्यापारी आणि शेतकरी वर्गात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थांचे वाटप केले जाते. नोकरी, व्यवसाय यानिमीत्त परगावी असलेली कुटूंबातील मंडळी एकत्र येतात. आनंदाने दिवाळी साजरी करतात.

धनत्रयोदशी तारिका :

या वर्षी धनत्रयोदशी ही 23 ऑक्टोबर ला आहे. 

धनत्रयोदशी म्हणजे काय ?
अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हटले जाते . धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधीत अवजारांची पूजा करतात.शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात.

तर व्यापारी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वहया, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते.शेतकऱ्यांसाठी शेतातून आलेले नवे धान्य हेच त्याचे खरे धन असते. हीच त्याची संपत्ती असते. त्यामुळे तो धान्याची पूजा करतो.

त्यासाठी धने, गुळ, खोबरे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच झेंडू, शेवंती यांच्या फूलांचा हार, फुले देवाला वाहतात. आजच्या दिवशी अंगणभर पणत्या लावल्या जातात. घरांना विद्यूत रोषनाई केली जातो. घरे, गाव, शहरे व सारा आसमंत पणत्या आणि विद्यूत रोषनाईने उजळून निघतो.

व्यापारी व शेतकरी वर्गात आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. वैद्य लोक या दिवशी धन्वंतरी ची पूजा करतात.


हे पण वाचा ⤵️


FAQ
Q.1)या वर्षी धनत्रयोदशी कधी आहे ?
Ans.या वर्षी धनत्रयोदशी ही 23 ऑक्टोबर ला आहे.

Q.2)धनत्रयोदशी या दिवशी शेतकरी काय करतात ?
Ans.या दिवशी शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad