शिक्षक दिनाची माहिती मराठी | Teachers day Marathi Mahiti
शिक्षक दिवस २०२२: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज ५ सप्टेंबर शिक्षक दिवस याबद्दल आपण माहिती बघणारा अहोत. शिक्षक दिवस का साजरा करताना, शिक्षक दीनाबद्दल भाषण, कविता हे सर्व आपण बघणारा अहोत.
शिक्षक दिनाची माहिती मराठी | Teachers day Marathi Mahiti pdf | Teachers day poem in Marathi | Teachers day speech | शिक्षक दिन भाषण मराठी
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ।
आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन आहे आणि शिक्षण हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते...त्यामुळेच या दिवसाला फार महत्त्व आहे.
आपल्या भारत देशात 5 सप्टेंबर या रोजी शिक्षण दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते. त्याचं शिक्षकांप्रती प्रेम पाहून त्यांचा वाढदिवस म्हणून शिक्षक दिन साजरा करण्याचे भारत सरकारने ठरवले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.यादिवशी सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या पाया पडतात. आदरपूर्वक नमस्कार करतात.या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना गुलाबाचे फुल तर काही विद्यार्थी भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे. शिक्षक आपले सर्वात मोठे आणि महत्वाचे गुरु आहेत. सर्वच शिष्यांनी आपल्या गुरूंविषयी आदरपूर्वक सन्मान, प्रेम आणि कतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
शिक्षक अपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करतो.विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांमुळेच आपण जीवनामध्ये बऱ्याच काही नवनवीन गोष्टी शिकतो. भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर, कलेक्टर, लेखक शास्त्रज्ञ व थोर विचारवंत घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते.
शिक्षकामुळे सर्व मुले विचार करायला लागतात, चांगले शिक्षण घेतात आणि मोठ्या पदांपर्यंत पोहचतात.आपण आपल्या आई वडिलांपासून पहिल्यांदा दूर राहतो तेव्हा आपली संपूर्ण जबाबदारी शिक्षक घेतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मते घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. आपल्यावर चांगले संस्कार करतात.या प्रकारे आपले शिक्षक अपल्याना घडवत असतात.
शिक्षकाबद्दल प्रेम, आदर वक्त करण्यासाठी व शिक्षकांमधील आणि विद्यार्थी मधल नाते कायम ठेवण्यासाठी शिक्षक दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यादिवशी अनेक शाळांमध्ये शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.अनेक विद्यार्थी आपल्या आपल्या शिक्षकांबद्दल आपली भावना,प्रेम,मनोगत व्यक्त करतात.शाळेकडून सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या जातात. बऱ्याच शाळेमध्ये या दिवशी मुले एका दिवसापुरते शिक्षक बनतात आणि विद्यार्थ्यांना शिकवता.
शिक्षणाचे महत्व समजून सांगणारे सर्व शिक्षक आणि त्यासाठी अथक प्रयन्न करणारे सर्व समाजसुधारकांना , शिक्षिकांना आपल्या सर्वान कडून शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
शिक्षक दिन भाषण मराठी | Teachers day speech in Marathi
आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, माननीय गुरुजनवर्ग, उपस्थित असलेले माझे सर्व मित्र - मैत्रिणींनो आज ५ सप्टेंबर आयुष्याला आधार, आकार आणि ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस.
शि- म्हणजे शीलवान
क्ष- म्हणजे क्षमाशील
क- म्हणजे कर्तव्यदक्ष
अशा सर्व शिक्षकांना वंदन करून शिक्षक दिनानिमित्त मी दोन शब्द बोलणार आहे. ते तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे.
निरागस मुलांना आकार देतो, शून्यातून मुलांना घडवतो, विद्यार्थ्यांच्या यशासाठी, ज्ञान देण्यासाठी नेहमीच तत्पर असतो,तो व्यक्ती म्हणजे शिक्षक गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून आहे.
जीवनात आई वडिलांची जागा कोणीच भरू शकत नाही. आपल्याला या जगात आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरू आपले आई-वडील. शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवून योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरीत करतात. दरवर्षी पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रति सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं.समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असते. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत कारण शिक्षकच चांगले चरित्र निर्मित करू शकतात..
आपले विचार मत आणि व्यक्तिमत्त्व घडण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांनी प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते कारण शिक्षकांमुळे भविष्यातील डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते.
!! दिया ज्ञान का भंडार हमे,
किया भविष्य के लिये तयार हमे,
है आभारी ऊन गुरुओं के हम,
जिसने किया कृतज्ञ अपार हमे !!
शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. आणि त्यांच्या उपकरातून (ऋणातून) आपण कधीच मुक्त होऊ शकत नाहीत.आज शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे चित्र समाजात दिसत आहे.गुरू-शिष्य संबंधातील पवित्र भावना लोप पावत आहे. यासंबंधातील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी डॉक्टर राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक हा आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात.
यामुळे विद्यार्थ्यांनी अपल्या आपल्या गुरुजनांचा आदरपूर्वक सन्मान,मान केला पाहिजे चला तर मग शिक्षक दिनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करूया.
!! मेरे जैसे 'शून्य' को
'शून्य' का ज्ञान बताया,
हर अंक के साथ 'शून्य'
जोडने का महत्व बताया
सबके सामने कर सकू बात,
यह विश्वास मुझमे जगाया,
हे गुरु तेरे उपकार का कैसे चुकाऊ मैं मोल,
लाख किंमती धन भला,
गुरु है मेरे अनमोल !!
शिक्षक दिन कविता मराठी | Teachers day poem in Marathi
मायेचा पदर सोडूनी
पहिलं पाऊल जेव्हा टाकलं !!
शाळेमध्ये येताच मी
'बाई' तुम्हांला पहिलं पाहिलं !!
अनोळखी तो चेहरा हासरा
का जाणो पण आपला वाटला !!
हात धरला जेव्हा माझा
हुंदका रडणारा आपसूक थांबला !!
हात धरला जेव्हा माझा
हुंदका रडणारा आपसूक थांबला !!
अक्षरांची ती उजळणी अन्
सुरू झाल्या बेरीज वजावटी !!
बघता बघता रंगून गेली
होती कोरी जी पाटी !!
बघता बघता रंगून गेली
होती कोरी जी पाटी !!
बघता बघता रंगून गेली
होती कोरी जी पाटी !!
गुरू-शिष्याचं नातं आपलं
आपुलकीने तुम्ही जपलं !!
काय कमी नि काय अधिक
माझ्यामधलं तुम्ही जाणलं !!
केवळ पुस्तकेचं नव्हे तर
शिकवली माणसेही वाचायला !!
म्हणूनच पुस्तकांच्या पलीकडचे
जग आज समजतंय मला !!
शिकवण तुमची आज सोबती
आयुष्याच्या वळणावरती !!
काय कुठे ना उणे राहिले
ओंजळ ना राहिली कधी रिती !!
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1) शिक्षक दिान कधी साजरा केला जातो ?
Ans.आपल्या भारतात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.
Q.2) कोनाच्या जन्मदिवसा निमित्त शिक्षक दिन साजरा करतात ?
Ans.राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षक दिन साजरा करतात.
Q.3)आपल्या जीवनातील सर्वात पहिला गुरू कोन ?
Ans.जीवनातील सर्वात पहिले गुरू आपले आई-वडील.