हिंदी दिवस मराठी माहिती | Hindi Divas Marathi Mahiti
हिंदी दिवस 2022 : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण हिंदी दिवसाबद्दल माहिती निबंध आणि भाषण बघणारा आहोत. तुम्हाला माहीतच असेल हिंदी भाषा ही जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
हिंदी दिवस मराठी माहिती pdf | हिंदी दिवस भाषण निबंध | Hindi Divas Marathi Mahiti | Hindi Divas essay and speech in Marathi
आपल्या भारत देशात दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेच्या विकासाची समीक्षा करत या दिवसात साजरे केले जाते. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताच्या कार्यकारी आणि राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. म्हणून संपूर्ण देशात 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
!! जिसमे है मैने ख्वाब बुने
जिससे जुडी मेरी हर आशा है
जिससे है मुझे पहचान मिली
वो मेरी हिंदी भाषा है !!
हिंदी जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा मानली जाते. हिंदी पाकिस्तान, नेपाळ, मॉरिशस, बांगलादेश या देशांमध्ये ही बोलली जाते. भारतात सर्वाधिक लोक मातृभाषा म्हणून हिंदीचा प्रयोग करतात.हिंदी दिवसा निमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते विविध अवॉर्ड आणि पुरस्कार दिले जातात. हिंदीतील नामवंत लेखक व कवी यांना उत्कृष्ट लेखन कार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. हिंदी दिवस भारतात सर्व शाळा कॉलेज ऑफिस विविध ठिकाणी मोठ्या धूमधडाक्याने साजरा केला जातो.
हिंदीचा वापर करणे हेतू विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. वकृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा, कविता, निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा इत्यादी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमधून आपणास हिंदी विषयी ज्ञान व आदर वाढवण्याची संधी मिळते.भारत सरकारने आपल्या शासकीय व निमशासकीय संस्थांचा कारभार हिंदीतून करणे बंधनकारक मानले आहे. सोबत इंग्रजीचा ही पर्याय दिला आहे. त्यामुळे हिंदीचा सन्मान वाढविणे जरुरी आहे. देशाच्या विकासात राष्ट्रभाषेचा मोलाचा सहभाग असतो.
भारताच्या इतिहासाची माहिती आपणास हिंदीतून मिळते. साहित्य, कला आणि वाड्मयाचा परिचय हिंदीतून मिळतो. आज युवा वर्गात इंग्रजी आणि इतर विदेशी भाषा शिकण्याचे वेड लागले आहे. त्यामुळे हिंदीचे महत्व टिकून ठेवण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि हिंदी विषयी आदर निर्माण करणे फार जरुरी आहे.हिंदी दिवस हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी खऱ्या अर्थाने हिंदी विषयी आपले प्रेम आपण सर्वांसमोर अभिप्रेत करू शकतो. हिंदीच्या अंगीकारणे कोणकोणते फायदे होऊ शकतात? त्याचा राष्ट्र विकासात कसा सहभाग होऊ शकतो? तसेच आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रभावना कशी निर्माण केली जाते हा हिंदी दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे.
आपल्या मातृभाषे सोबतच हिंदीचा ही एक संपर्काच्या दृष्टीने उपयोग करावा. राष्ट्र निर्माणात हिंदी चे योगदान आणखी मजबूत करावे हे गरजेचे आहे.
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1) हिंदी दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans.14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो.
Q.2) हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा कधी देण्यात आला ?
Ans.14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताच्या कार्यकारी आणि राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला.
Q.3) जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे ?
Ans.हिंदी जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा मानली जाते.