नवरात्री उत्सव मराठी माहिती 2022 pdf |नवरात्रीचे नऊ रंग | देवीची नऊ रूपे | नवरात्रीची नऊ नैवेद्य |नवरात्र नऊ दिवसाच्या नऊ माळा | Nine colours of Navratri | Navratri Nine mala | Navratri festival Marathi Mahiti pdf
नवरात्री उत्सव मराठी माहिती 2022: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण नवरात्रीच्या उत्सवाची संपूर्ण महीती,नवरात्री नऊ रंग, देवीची नऊ रूपे, नऊ नैवेद्य,नऊ दिवसाच्या नऊ माळा हे सर्व माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.
➡️महात्मा गांधी जयंती निबंध भाषण
नवरात्री उत्सव मराठी माहिती 2022 | Navratri festival Marathi Mahiti
अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. सार्वजनिक मंडळामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. आणि नवरात्रीच्या नऊ दिवस देवीची मनभवातन पूजा, आरती व तसेच देवीची सेवा केली जाते.
घटस्थापना करताना देवीसमोर घट उभारला जातो.व यामध्ये एका टोपलीत काळी माती घेतली जाते आणि त्यामध्ये नऊ धान्य परली जाते आणि या मातीमध्ये पाण्याने भरलेले मटके ठेवले जाते.त्या पाण्याच्या मटक्यावर विड्याची पाने ठेवली जाते आणि त्यावर नारळ ठेवला जातो. घटाच्यावर पाच फळे बांधली जातात.पहिल्या दिवशी नवरात्रीच्या घटाला विड्याच्या पानांची माळ घालतात. व नंतर आपल्या घटाला तिळाच्या फुलाची किंवा झेंडूच्या फुलांची माळ घालतात.नवरात्रातील नऊ दिवस देवीसमोर अखंड दिवा. तेवत ठेवला जातो. सर्वजण मनोभावे देवीची पूजा आरती करतात. भक्त नऊ दिवस उपवास करून अनवाणी राहून देवीचे व्रत पूर्ण करतात.
दसऱ्याच्या आदल्या दिवशी देवीसमोर होमहवन केले जाते. काही सार्वजनिक मंडळे भजन, कीर्तनाचे सुद्धा आयोजन करतात. तसेच नवरात्रीच्या सातव्या दिवशी घटाला कडाकण्या बांधतात. यासोबतच घटाला पिठाची वेणी, फणी, कंगवा, मंगळसूत्र अशा स्त्रीच्या संपूर्ण साजाने सजवले जाते.नवरात्री मध्ये नवरात्रीच्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी आणि आठव्या दिवसाला महाअष्टमी , तर नवव्या दिवसाला महानवमी असे म्हणतात.नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात.

देवीप्रमाणेच स्त्रियाही नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करून देवीची मनोभावे पूजा करतात. देवीने महिषासुरा बरोबर नऊ दिवस भीषण युद्ध करून त्याचा वध केला, यमुळेच तर देवीला महिषासुरमर्दिनी असे सुद्धा म्हटले जाते. व तसेच नवरात्रीमध्ये जागोजागी देवीसाठी मंडप उभे केले जातात. सजावट केली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. गरबा, दांडिया यांचे आयोजन केले जाते.या प्रकारे सर्वीकडे नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहाचे वातावरण असते.
नवरात्रीमध्ये अनेक ठिकाणी भोंडल्याचे आयोजन केले जाते.या मध्ये एका पाटावर हत्ती काढला जातो व तो मधोमध ठेवतात आणि त्याच्या भोवताली फेरा धरून सर्वजण भोंडल्याची गाणी म्हणतात. सर्वजण आपापल्या घरून भोंडल्याची खिरापत आणतात.त्यानंतर सर्वजण मिळून खिरापत खातात. नवरात्रीचे नऊ दिवस सर्व देवीच्या मंदिरांमध्ये गर्दी असते. बऱ्याच ठिकाणी नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या मंदिराजवळ यात्रा असते.देवीचे भक्त याकाळात जोगवा मागतात. कमीत कमी पाचतरी घरी जाऊन मूठभर तांदूळ आणि पीठ मागणे यालाच जोगवा मागणे अस म्हणतात.
मंगळवार, शुक्रवार या वाराला आणि पौर्णिमा व नवरात्रामध्ये नऊ दिवस हा जोगवा जवळपास सर्व जण मागितला जातो. जास्ती करुन देवीचे भक्त गळ्यात कवड्याची माळ घालून देवीचा जोगवा मागायला जातात. या प्रकारे नवरात्रीचा सण हा भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

नवरात्री नऊ रंग, देवीची नऊ रूपे, नऊ नैवेद्य,नऊ दिवसाच्या नऊ माळा | Nine colours of Navratri
दिवस १ :
पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी पर्वतराज हिमालया यांची कन्या देवी 'शैलपुत्री' ची पूजा केली जाते. दुर्गा मातेच्या नऊ रूपांपैकी हे पहिले रूप मानले जाते.
Date:२६/ सप्टेंबर/ २०२२
पहिली माळ (घटस्थापना)
शुभ रंग : पांढरा
नैवेद्य : शुद्ध (साजूक) तूप
देवीला पांढऱ्या रंगाची सुवासिक फुले वाहावी.
Date:२६/ सप्टेंबर/ २०२२
पहिली माळ (घटस्थापना)
शुभ रंग : पांढरा
नैवेद्य : शुद्ध (साजूक) तूप
देवीला पांढऱ्या रंगाची सुवासिक फुले वाहावी.
दिवस २ :
दुसरा दिवस (Second Day) - २७ / सप्टेंबर / २०२२ नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई 'ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते.
ब्रम्हचारिणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी.
शुभ रंग : लाल
नैवेद्य : साखर
देवीला हिरव्या रंगाच्या फुलांची/पानांची माळ घालू शकता.
ब्रम्हचारिणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी.
शुभ रंग : लाल
नैवेद्य : साखर
देवीला हिरव्या रंगाच्या फुलांची/पानांची माळ घालू शकता.
दिवस ३ :
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईचे तिसरे रुप म्हणजे
देवी चंद्रघंटा'ची पूजा केली जाते.
तिसरी माळ : दि. २८/ सप्टेंबर / २०२२
शुभ रंग : निळा
नैवेद्य : या दिवसी दूध किंवा दूधापासून तयार केलेली मिठाई , खीरीचा नैवेद्य ठेवावा.
"कमळ किंवा शंखपुष्पीची फूलं अर्पण करावे.

दिवस ४ :
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रुप म्हणजे
आई 'कुष्मांडा'ची पूजा केली जाते.
चौथी माळ : २९/सप्टेंबर / २०२२
नैवेद्य : या दिवशी मालपोह्याचा/ गोड भजी (गुलगुले) चा नैवेद्य ठेवावा.
शुभ रंग : पिवळा
पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी.

दिवस ५ :
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई दुर्गेच्या 'स्कंदमाता' रुपाची पूजा केली जाते.या दिवश देवी दुर्गा आईचे पाचवे रुप मोक्ष आणि प्रत्येक सुख प्रदान करते.
पाचवी माळ : ३० / सप्टेंबर / २०२२
शुभ रंग : हिरवा
नैवेद्य :आईला केळीचा नैवेद्य ठेवावा
या दिवसाला देवीच्या पुजेसाठी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.
दिवस ६ :
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या सहाव्या रुपाचे
म्हणजेच आई कात्यायनी' ची पूजा केली जाते.
सहावी माळ : दि. १ / ऑक्टोबर/ २०२२
शुभ रंग : राखाडी
नैवेद्य :आईला मधाचा नैवेद्य ठेवावा.
लाल आणि पिवळ्या रंगाची फूलं आईला अर्पण करावी. यामुळे भक्तांच्या आकर्षण शक्तीमध्ये वृद्धी होते.
दिवस ७ :
नवरात्री मध्ये सातव्या दिवसाला आई कालरात्रीची पूजा केली जाते.हे आईचे रुप खूपच जास्त शक्तीशाली मानले जाते.
सातवी माळ : दि. २/ऑक्टोबर/२०२२
निळ्या रंगाची फूलं अर्पण करावी.
शुभ रंग: नारंगी
नैवेद्य :गुळाचा नैवेद्य ठेवावा.
यामुळे जीवनात असलेल्या संकटापासून मुक्ती मिळते.
दिवस ८:
नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई 'महागौरीची पूजा केली जाते. भरपूर लोकं या दिवशी कन्या पूजन सुध्दा करतात.
आठवी माळ : दि. ३/ऑक्टोबर/२०२२
शुभ रंग : मोरपंखी / peacock green
नैवेद्य : आईला नारळाचा नैवेद्य ठेवावा.
पूजा करते वेळास खास करून लाल,गुलाबी आणि मोरपंखी रंगाचीच फूलं अर्पण करावी.
दिवस ९:
नवरात्री मधील नवव्या दिवशी आई 'सिद्धीदात्री' ची पूजा केली जाते. यादिवशी कन्या पूजन देखील केले जाते.
शास्त्रानुसार आईचे हे रुप सिद्धी प्रदान करणारे आहे.
नववी माळ: महानवमी दि. ४ / ऑक्टोबर / २०२२
शुभ रंग: गुलाबी
या दिवशी आईला जास्वंदीची फूलं अर्पण करावी.
नैवेद्य :यादिवशी आईला तीळ किंवा तीळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य ठेवावा.यामुळे चांगले परिणाम होतात.
नवरात्र समाप्ती :
विजयादशमी (दसरा) चांगल्या चा वाईटावर विजय..
घट हलवणे, देवीची आरती करून नारळ फोडणे.
नैवेद्य दाखवणे, (पुरणपोळी/खीर पुरी) उपवास सोडणे.
शेतकरी त्यांच्या शेतातील लागणाऱ्या अवजारांची पूजा करतात व घराला आपल्या वाहनांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातली पाहिजे. व एकमेकांस आपट्याची पाने द्या. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त वाहन खरेदी सोने खरेदी शुभ योग.विद्यार्थ्यांनी पाटीपूजन करावे.
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1)नवरात्र उत्सवाला सुरुवात कधी होते ?
Ans.अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते.
Q.2)घटस्थापना कधी केली जाते ?
Ans.नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते.
Q.3)देवीला महिषासुरमर्दिनी का म्हणले जाते ?
Ans कारण देवीने महिषासुरा बरोबर नऊ दिवस भीषण युद्ध करून त्याचा वध केला म्हणून म्हणले जाते.