घटस्थापना माहिती मराठी 2022 | Ghatasthapana in Marathi Mahiti 2022
घटस्थापना माहिती2022 : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण घटस्थापना म्हणजे काय,घटस्थापना शुभ मुहूर्त,घटस्थापनेसाठी लागणारे साहित्या हे आपण पुर्ण पणे बघणारा अहोत.
घटस्थापना माहिती मराठी 2022 pdf |घटस्थापना शुभ मुहूर्त | Ghatasthapana in Marathi Mahiti 2022 | घटस्थापनेसाठी लागणारे साहित्या
आपल्या भारत देशात अनेक सण साजरे केले जातात, त्यापैकीच एक सण म्हणजे नवरात्र. हा सण भारतातील विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करतात.
नवरात्रीतील नऊ दिवस सर्वजण मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करतात सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भजन, कीर्तन तसेच अनेक देखाव्यांचे आयोजन केले जाते. ते बघायला लोक एकत्रित येतात. बरेच लोक नऊ दिवस उपवास करून देवीचे व्रत पूर्ण करतात. नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात.
देवीप्रमाणे सर्व स्त्रियाही नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात. नवरात्रीमध्ये सर्वत्र सजावट पाहायला मिळते. मोठे-मोठे मंडप बघायला मिळतात. विविध सार्वजनिक मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्त्रिया, पुरुष तसेच लहान मुलं दांडिया. गरबा खेळतात. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. घ्या नऊ दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. कलकत्ता, गुजरात, बिहार, आसाम मध्ये या सणाला वेगळेच महत्व आहे. तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गापूज चे आयोजन केले जाते.
देवीने राक्षस महिषासुराचा वध केला म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी असे सुद्धा म्हटले जाते. दहाव्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते या दिवसाला दसरा असेही म्हणतात. हा सण एकमेकांना जवळ आणतो.वाईट गोष्टीवर मात करून नवीन गोष्टी आत्मसाद करण्याचा हा सण आहे.
घटस्थापना शुभ मुहूर्त | Ghatasthapna shubh Muharth
हिंदू पंचांगानुसार नवरात्रीची सुरुवात ही 26 सप्टेंबर ला सकाळी 3 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे आणि प्रतिबदेच्या समाप्ती ही 3 वाजून 8 मिनिटांनी आहे.
घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे तो वेळ आहे सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुरू होऊन सकाळी 10 वाजून 19 मिनिटापर्यंत असणार आहे.
अभिजीत मुहूर्त जो आहे तो सकाळी 11 वाजून 54 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी 12 वाजून 42 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही स्थापना करू शकता अत्यंत शुभ अशा मुहूर्त आहे घटस्थापने साठी.
घटस्थापनेसाठी लागणारे साहित्या | Ghatasthapna Sahitya
घटस्थापनासाठी लागणारे साहित्य शेतातील काळी माती,एक पत्रावळ, पाच प्रकारची, सात प्रकारची किंवा नऊ प्रकारचे धान्य यामध्ये गहू, चाळी इतर कडधान्य वापरावीत किंवा बाजारातील सर्व धान्य एकत्रित मिळतात ती आणली तरी चालल घरात जर ही धान्य उपलब्ध असतील तर वापरली तरी चालेल यामध्ये एक दोन धान्य कमी असेल तरी पण काही हरकत नाही.
आता कुंभ कळस तुम्ही वातीचा वापरू शकता, विड्याची पाने, सुपारी, खारीक खोबरं, बदाम, हळकुंड,सुट्टी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप दीप, हळद, कुंकू,गुलाल, अक्षदा, कापसाचे वस्त्र,घंटा, फुले हे पूजेचे साहित्य तर आवश्यकता आहे.
याशिवाय दोन नारळ एक कळसावर ठेवण्यासाठी आणि एक देवीची ओटी भरण्यासाठी ओटी भरण्यासाठी थोडेसे गहू, सतीच वान ,आरतीसाठी निरंजन, निरंजना मध्ये तूप आणि वाती, समोर लावण्यासाठी समई व समई मध्ये तेल आणि वाती याशिवाय खडीसाखरेचा प्रसाद आणि गटाला बांधण्यासाठी झेंडूच्या पानाची माळ आणि गटाच्या भोवती काढण्यासाठी रांगोळी हे सर्व साहित्य घट बसवताना आवश्यक आहे.
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1)घटस्थापना कधी केले जाणार आहे ?
Ans.26 सप्टेंबर ला सकाळी 3 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे.
Q.2)घटस्थापना हा नवरात्रीचा कितवा दिवस आहे ?
Ans.घटस्थापना हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे.
Q.3)नवरात्र उत्सवाला सुरवात कधी होते ?
Ans.अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरवात होते.