हरतालिका तृतीया मराठी माहिती | हरतालिका पूजा साहित्य | हरतालिका व्रत कथा | Hartalika Tritiya Marathi Mahiti pdf | Hartalika vrat katha
हरतालिका तृतीया २०२२: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हरितालिका तृतीया व्रत, पुजा, साहित्य याबद्दल महिती बघणारा अहोत. व या वर्षी हरतालिका व्रत ३० ऑगस्ट मंगळवार या दिवशी पूजा व्रत करण्यात येणार आहे.
हरतालिका तृतीया मराठी माहिती | Hartalika Tritiya Marathi Mahiti
गणेश चतुर्थी च्या अधल्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतियेला"हरतालिका" असे म्हणले जाते.या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात. हरितालिका या शब्दाचा अर्थ असा होतो की "हरित" म्हणाजे हरण करणे आणि "अलिका" म्हणजे मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणीच्या मदतीने देवी पार्वतीने शंकराचे हरण केले असा या शब्दाचा अर्थ होतो.
हिंदू धर्मातील कुमारिका त्यांना चांगला मनासारखा पती मिळावा म्हणून त्या"हरतालिका"हा व्रत मनापासून भवणापूर्वक करताता. आपल्याकडे विवाह झाल्यानंतर त्यांच्या मनासारखा पती मिळाला तरी सुद्धा हा व्रत करतात कारण एकदा चालू केलेला शंकर भगवनाचा व्रत मोडू नये अशी स्त्रियांची भावना असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.
पूजाविधी :वाळू पासुन शिवलिंग तयार करून त्याची पुज्या केली जाते किंवा सखी आणि देवी पार्वती यांची शिवलिंगासह मूर्ती आणून तिचीही पूजा करण्याची पद्धत प्रचलित आहे. पूजेचे स्वरूप संकल्प,सोळा उपचार पूजन व सौभाग्यलेणी अर्पण, नवेद्य, आरती आणि कथा वाचन अशे पूजेचे सामान्य स्वरूप आहे. व्रतराज या या ग्रंथात या हरितालिका व्रताचे वर्णन आढळते. नंतर दुसऱ्या दिवशी महिला रुईच्या पानला तूप लावून ते चाटतात आणि नंतर आपला उपवास सोडतात.
हरतालिका पूजा कशी करावी आणि त्याचे साहित्य | How to perform Hartalika Puja and its materials
हरतालिकेच्या पुजेला लागणारे साहित्य:
पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रेती रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तर, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व १६प्रकारच्या पत्री (१६ झाडांची १६-१६ पानं)
हरतालिका पूजा कशी करावी :
गणेश चतुर्थी च्या आधल्या दिवसी भाद्रपद शुद्ध तृतीयेला "हरितालिका"असे म्हणले जाते.या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. अंघोळ केल्यानंतर घरामधे एखादय स्वच्छ केलेल्या जागेवर चौरंग मांडावा आणि रांगोळी काढून केळीच्या खांबनी चारही बाजूने शुभोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि पार्वतीच्या सखिसह शिवलिंग स्थापित करावे. आणि उजव्या बाजूला तांदळाच्या एका ढिगावरील सुपरीवर किंवा नारळावर गणपती मांडावा आणि समोर पाच विडे मांडून तिथे खारीक, खोबर, सुपारी, नाने व एखादे फळ ठेवावे पण सर्वप्रथम आपल्याला स्वत:ला हळदी कुंकू लाऊनच देवासमोर विडा ठेवावेत.अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा.
घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.जे काही आपण पूजेसाठी घेतलेले साहित्य विधिपूर्वक देवाला अर्पण करावेत.
पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचा क्रम असा आहे: बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, , डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमरिकेला मनासारखा पती मिळण्यासाठी सुवासिनींनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा.
हरितालिका या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत आणि नंतर रात्री फुगड्या, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरितलिकेची कथा एकूण आणि हरितलीकेची आरती करून बारावजल्या नंतर रुईच्या पानावर दही टाकून ते चाटावे.यानंतर देवीचा हा मंत्र म्हणावा.
कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी
नन्दगोपसुतं देवि पतिं में कुरु ते नमः ।।
दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे (पूजा) विसर्जन करावी.
हरतालिकेची व्रत कथा | Vrata Katha of Hartalika
एके दिवशी शंकरपार्वती कैलासपर्वतावर बसली होती.तेव्हा माता पार्वती शंकराला विचारते महाराज मला सांगा सर्व व्रतात चांगलं अस व्रत कोणत म्हणजे त्याचा श्रम कमी आणि फळ जास्त अस एखाद व्रत असल तर मला सांगा आणि मी तुम्हाला कोणत्या पुण्याईन तुमच्या पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले,जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णान मध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवान मध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांन मध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वांन मध्ये श्रेष्ठ आहे.
ते तुला सांगतो आणि हेच व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस त्याच पुण्याई मुळे तु मला प्राप्त झालीस ,हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला केल पाहिजे. ते तू पूर्विजन्मी कस केलंस ते मी तुला आता सांगतो.तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू एक तप केला होता चौसष्ट वर्षं झाडाची पिकलेली पान खाऊन , थंडी, पाऊस आणि ऊन हि तिन्ही दुःख सहन केले.हे तुझे श्रम बघून तुझ्या वडिलांना खूप दुःख झाले व अशी कन्या कोन्हाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली होती.
इतक्यात तिथे नारद मुनी आले आणि हिमालयाने नारद मुनी ची पूजा केली आणि इथे येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणले तुझी कन्या उपवर झाली आहे ती तू भगवान विष्णू ला द्यावी तो तिचा योग्य पती आहे.त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. तनी
त्याहि गोष्ट मान्य केली नंतर नारद मुनी तिथून विष्णूकडे आले आणि ही गोष्ट विष्णूला कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले.
नारद मुनी गेल्यावर तिच्या वडिलांनी तिला हि हकीकत सांगितली,ती गोष्ट तिला रुचली नाही ,ती रागावली अस पाहून तिच्या सखिने रागवण्याच कारण तिला विचारलं तेव्हा तीन सांगितलं महादेवावाचून मला दुसरा पती करण नाही असा माझा निश्चय आहे, अस असून सुध्दा माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा तेव्हां तिच्या सखीने तिला घोर अरण्यात नेल. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस . त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतियेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि नंतर तिला वर मंगण्यास सांगितल ती म्हणाली, तुम्ही माझे पती व्हाव याशिवाय माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही.
नंतर ती गोष्ट तिने मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा तिथं आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं . मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तिला अर्पण केल. अश्या प्रकारे या व्रताचे तिची इच्छा पुर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असं म्हणतात.
या व्रताचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचे आहे तिथे त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब बांधून ते स्थळ सुशोभित करावेत व समोर रांगोळी काढून देवी पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावेत षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. व त्यानंतर ही कहानी करावीत व रात्री जागरण करावं.या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यशाशक्ति वाण द्यावं, दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1) हरतालिका म्हणजे काय ?
Ans.गणेश चतुर्थी च्या आधल्या दिवसी भाद्रपद शुद्ध तृतीयेला "हरतालिका"असे म्हणले जाते.
Q.2) हरतालिका व्रत कोन करू शकत ?
Ans.कुमारिका आणि विवाहित स्त्रिया सुध्दा हा व्रत करू शकतात.
Q.3) सर्व व्रतात श्रेष्ठ व्रत कोणत आहे ?
Ans.सर्व व्रतात हरितालिका हे व्रत सर्वांन मध्ये श्रेष्ठ आहे.