बैल पोळा निबंध मराठी | बैल पोळा सनाची सजावट |Bail Pola Nibandh in Marathi |Bail Pola decoration | बैल पोळा कविता मराठी
बैल पोळा 2022: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैल पोळा तर आपण आज पोळा सनावर निबंध,सणाची सजावट आणि पोळा सणाच्या कविता आपण बघणार आहोत.
➡️हरतालिका तृतीया मराठी माहिती
➡️श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती
बैल पोळा निबंध मराठी | Bail Pola Nibandh in Marathi
शेतामध्ये वर्षभर राबून
जो करतो धरणी मातेची सेवा
अशा अपार कष्ट करणा-या
सर्जा राजाचा सण आहे बैलपोळा !!
श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पाहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने. हिंदू संस्कृतीत वृक्षां प्रमाणेच वन्यजीवांना देखील पूजनीय मानले आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यांचा समवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलांप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे पाहिले जाते. पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जा-राजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.
शेतकऱ्यांसोबत हमेश्य राबणारा, कष्ट करणारा बईलाबद्दल आभार (कृतज्ञता) व्यक्त करण्यासाठी गावातील लोक बैलाला खूप महत्व देतात. महाराष्ट्रातील काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात याला तान्हा पोळा म्हटले जाते.
बैलपोळा विषयी एक कथा आहे. जेव्हा प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस भगवान कृष्णाचा वध करण्याचा प्रयत्न करत होता. एकदा मामा कंसाने पोलासुर नावाचा राक्षस कृष्ण भगवंताचा वध करण्यासाठी पाठवला होता.त्या राक्षसाचा पराभव करून सर्वांना चकित केले हित. तो दिवस श्रावण अमावस्येचा होता म्हणून या दिवसाला 'पोळा' म्हणू लागले. हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून सुद्धा साजरा केला जातो.पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे.
'आज आवतन द्या उद्या जेवायला या' असे आमंत्रण बैलांना दिले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते. घरी आल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके दिले जातात. शिंगांना बेगडी, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवळ्या आणि पायात घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायामध्ये चांदीचे करदोडयाचे तोडे घालतात. नवीन वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झूल पांघरलेली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ केला जातो. घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजा करतात पोळ्याला कोणत्याही बैलाला कामाला लावलं जात नाही. गोडधोडाचा पुरणपोळीचा घास त्यांना भरवला जातो. बैलांची कायम निगा राखणाऱ्या गडयाला नवे कपडे दिले जातात.मग बैलांना पुरण पोळी अस जेवण चारल्यवर त्यानं गावाबाहेर मंदिरात नेतात.
सर्व शेतकरी आपापल्या जोड्या घेऊन एका ठिकाणी एकत्र येतात. सर्व बैलांना अंबाचे तोरण बांधून बैलांना रांगेत उभे करतात. ढोल- ताशे नगारे वाजवले जातात. बैलांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. ज्या जोडीला सर्वात चांगले तयार केले असेल त्या जोडीला पारितोषिक दिले जाते. प्रतेक गावागावात वेगवेगळी परंपरा असतात त्या प्रमाणे बैल पोळा उत्सव साजरा झाल्यावर कार्यक्रम संपन होतो.घरी निघताना बैलांना घरोघरी नेले जाते. तेथे आयाबाया बैलांची पूजा करतात.
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील मुख्य घटक असलेल्या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा.
॥ तुझ्या अपार कष्टाने
बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई !!
सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
बैल पोळा सणाची सजावट | Bail pola festival decoration
पोळ्याच्या आधल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याच्या दिवशी त्यांना तलाव,नंदी,ओढ्यात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणले जाते.आज या दिवसाला बैलाच्या मान आणि खांद्याला तुपाने आणि हळदीने चोळले जाते.व बैलाच्या पाठीवर काही टिपके काडले जाते, त्यांच्या अंगावर झुल टाकली जाते, शिंगांना कलर, बाशिंग, गळ्यात घुंगराच्या माळा आणि कवड्या,नवीन वेसण आणि कासरा, पायात तोडे, आणि त्यांना जेवण पुरण पोळीचा नैवेद्य असतो.
या दिवशी सर्व शेतकरी आपल्या आपल्या बैलाला नदिना नेतात आणि अंधोल घालतात त्याला वेवस्तीत धुतात आणि त्यांच्या शिंगाला हिंगोल लावतात, बलून, अंगावर झुल टाकतात, गळ्यात सुताच्या माला बांधतात व पायात घुंगरे बांधले जाते आणि डोक्याला बाशिंग अश्या वेगवेगळ्या प्रकारे बैलाला सजवले जाते.या दिवसाचे महत्त्व खूप आहे, शेतकरी पोळ्या ची वाट खूप आतुरतेने पाहत असतो.शेतकऱ्यांचा सखा जिवलग मित्र सर्जा राजाचा आजचा दिवस हा मनाचा असतो.पोळ्याच्या दिवशी बैलाला नांगराला किंवा गाडीला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते.
पोळा हा सण शेतकऱ्याचे बैलावर असणारे प्रेम हे दर्शवतो. बैलांवर प्रेम भावना व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषत: विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भात, तेलंगणा यांच्या सीमेवर सुद्धा पोळा हा सण साजरा केला जातो. ज्या लोकांकडे शेती नाही ते लोक मातीच्या बैलाची पूजा करतात.
आताच्या परिस्थितीत काय झालाय यांत्रिकरनचा वापर जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बैलाचअहत्व कमी होत चाललेलं आहे. तरीही काही शेतकरी आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी बैलावरच अवलंबून राहावं लागतं. दिवसभर ऊन्हात राबराब राबणाऱ्या बैलाला विश्रांती देणारा सण म्हणजे बैल पोळा.कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकरणाच्या युगात शेतीत बैलांचा सहभाग कमी झालाय.तरी सुद्धा शेतकऱ्याच्या मनात बळीराजाच्या स्थान कायम राहणार.
शेतकऱ्या सोबत राबराब राबणारा बैलाचे कौतुक करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.ते पोळ्याचे दोन दिवस बैलाला कोणतेही काम करू दिले जात नाही, त्यांना अंघोळ घालून खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते. त्यांना पुरणपोळी खाऊ घातली जाते व वाजत गाजत मिरवणूक कडली जाते.
बैल पोळा सनाच्या कविता | pola kavita marathi
कविता 1
कृषीप्रधान देशात
शेती मुख्य व्यवसाय
घास जगाच्या मुखात
भरविते काळी माय !!
"उभ्या शेतात राबतो
रात्रंदिस बळीराजा
साथ मालकाची देती ,
बैलजोडी सर्जा-राजा !!
मुक्या जीवाच्या साथीने
पिके वामानून मोती
आज पोळा आनंदाचा
त्यांची ओवाळू आरती !!
प्रेमे न्हाऊ माखू घालू
देऊ विसावा क्षणाचा
वस्त्रालंकार घालून
हात फिरवू प्रेमाचा !!
शिंगे रंगवून त्याला
बांधु बाशिंगाचा साज
पायी रुणझुण वाजे
घुंगरांचा हा आवाज !!
पाठीवरी शोभे झूल
गळा कवड्यांच्या माळा
थोडं होऊ उतराई
करु साजरा हा पोळा !!
दिव्य स्वरूप खुलले
सजे नंदी शंकराचा
करू नैवेद्य अर्पण
घास घालू पक्वान्नाचा !!
आज पुरणाची पोळी
नको उरले-सरले
धन्यासाठी बारोमास
राब-राब राबलेले !!
शृंगारला सदाशिव
गावभर मिरविती
भाऊ मानूनीया त्याला
सुवासिनी ओवाळती !!
कष्टकरी जीव भोळा
शोभे अंगणाची शान
नित्य सेवेसाठी उभा
शेतकऱ्यांचा सन्मान !!
नका विसरू ते ऋण
नव्या तांत्रिक युगात
दिली होती साथ ज्यांनी
पूर्वी संकट काळात !!
कविता 2
आला आला शेतकऱ्या पोयाचा रे सण मोठा
हाती चईसन काठ्या आता शेंदूराले घोटा !!
आता बांधा रे तोरण सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या लावा शिंगाले शेंदूर !!
लावा शदूर शिंगाले शेल्या घुंघराच्या लावा
गयाधी बांधा जिला घंट्या घुंघरू मिरवा !!
बाधा कवड्यांचा ठा अंगावर झूल छान
माथी रेशमाचे गोडे बांधा पायात पैंजण !!
उठा उठा बहिणाई चूल्हे पेटवा पेटवा
आज बलाले निवेद पुरणाच्या पोया ठेवा !!
वढे नागर वेखर नहीं कटाल गनती
पीक शेतकच्या हाती याच्या जिवावर शेती !!
ऊभे कामाचे ढिगारे बैल कामदार बांधा
याले काही नाते झूल दांनचाऱ्याचाच मिथा !!
चूल्हा पेटवा पेटवा ऊठा ऊठा आयाबाया
आज बैलाले खुराक रांधा पुरणाच्या पाया !!
खाऊ द्यारे पोटभरी होऊ द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी आज करू द्या वागुल !!
आता ऐका मनातलं माझं येडीच सांगण
आज पोयाच्या सणाले माझे एवढं मागण !!
कसे बैल कुदाळता आदा-बादीची आवड
वझ शिंगाले बांधता बाशिंगच होई जड !!
नका हेलाडू बैलाले माझं ऐकारे जरास
व्हते आपुली हाऊस आणि बैलाले तरास !!
आज पुजारे बलाले फेडा उपकाराचं देन
बेला खरा तुझा सण शेतकऱ्या तुझं रीन !!
हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1) बैल पोळा सण कधी साजरा करतात ?
Ans. बैल पोळा हा सण श्रावण महिन्यात साजरा करतात.
Q.2) श्री कृष्णाच्या मामा चे नाव काय आहे ?
Ans. श्री कृष्णाच्या मामाचे नाव कंस आहे.
Q.3) पोळ्याला बैलाला काय चारतत ?
Ans. पोळ्याला पुरणपोळी चारतत बैलाला.