Type Here to Get Search Results !

लोकमान्य टिळक निबंध भाषण मराठी 2022 | Lokmanya Tilak nibandh marathi 2022.

लोकमान्य टिळक निबंध भाषण मराठी 2022 | Lokmanya Tilak nibandh Bhashan marathi 2022 |Lokmanya Tilak speech in marathi


लोकमान्य टिळक भाषण मराठी 2022

Lokmanya Tilak nibandh marathi :-  नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती बघणार आहोत. यामध्ये आपण लोकमान्य टिळकविषयी कविता, चारोळ्या, त्यांच्या कथा आणि निबंध,भाषण पाहायला मिळेल.


अनुक्रणिका (toc)

लोकमान्य टिळक निबंध मराठी| Lokmanya Tilak Assay in Marathi.

स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना देशभरात सुप्रसिध्द आहे. इंग्रजांना त्रस्त करून सोडणाऱ्या लाल बाल पाल या त्रिमूर्ती मधील बाल म्हणजेच बाळ गंगाधर टिळक होत. भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे प्रणेते म्हणजे लोकमान्य टिळक. इंग्रज त्यांना ' भारतीय अशांततेचे जनक असे म्हणत असत यातूनच त्यांना लोकमान्य' ही पदवी प्राप्त झाली. लोकमान्य टिळक हे थोर क्रांतीकारी, वकील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते होते. 
      त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीत चिखली गावात झाला. टिळकांचे वडिल शिक्षक होते. लोकमान्य टिळक सोळा वर्षांचे असतांना त्यांचे वडिल निधन पावले टिळकांनी पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातुन पदवी प्राप्त केली. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह तापीबाईंसोबत झाला.
       टिळकांनी आपल्या महाविद्यालयातील मित्रांना सोबत घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.त्यांनी १८८० साली पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुलची सुरुवात केली. 'केसरी' व 'मराठी' वृत्तपत्र सुरू करून आपल्या लेखणीतून लोकांमध्ये इंग्रजाविरुद्ध असंतोष निर्माण केला. १८८५ मध्ये पुण्यातच फर्ग्युसन कॉलेजची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक ऐक्य वृद्धिंगत हावे यासाठी 'सार्वजनिक गणेशोत्सव' व 'शिवजयंती' उत्सव सुरू केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत सुरूच होते. 
      १८९७ मध्ये इंग्रजांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना दिड वर्ष कैद केले. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या सुरत येथे अधिवेशनात आंदोलकाचे जहाल आणि मवाळ असे दोन गट विभागले गेले. जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते. १९०८ मध्ये टिळकांवर पुन्हा राजद्रोहाचा खटला चालला व त्यांना मंडालेच्या कारागृहात सहा वर्षांचा तुरुंगवास दिला गेला. तिथेच त्यांनी 'गितारहस्य' नावाचा ग्रंथ लिहीला. १९९६ साली त्यांनी 'होमरूल लीग' संघटनेची स्थापना केली. होमरूल म्हणजेच 'स्वशासन'. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते देशासाठी लढत राहिले. अखेर १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. भारत मातेच्या या महान सुपुत्रास त्रिवार अभिवादन.


लोकमान्य टिळक गोष्ट मराठीत | Lokmanya Tilak Story in Marathi.

Story .1

गोष्टीचे नाव:शेंगाची तरपले

      लोकमान्य टिळक शाळेत असताना त्यांची ही लोकप्रिय अशी गोष्ट आहे. 
      एकदा लोकमान्य टिळक शाळेत गेले होती तेव्हा शाळेमध्ये त्यांची मधली सुट्टी झाली होती.मग मधल्या सुट्टीमध्ये काही मुलांनी भूयमुगाच्य शेंगा आणल्या होत्या त्या त्यांनी त्यांच्या मित्र मध्ये वाटून खाल्या लोकमान्य टिळकांनी एकही शेंग खाल्ली नाही. 
    त्या मुलांनी शेंगा खायला काढल्या आणि त्या खाऊन त्यांची टरपले वाटल तिथे फेकले,बऱ्याच मुलांनी शेंगा खाल्ल्यामुळे शेंगाची टरपले सर्व वर्गात पसरली होती. मधली सुट्टी संपल्यावर पुढच्या तासाचे शिक्ष्यक वर्गात प्रवेश केला. वर्गात झालेला कचरा बघून त्यांना खूप राग आला.त्यांनी शेंगा कोण खाल्ल्या आहे विचारले तेव्हा सर्व मुले गप्प बसली.
     शिक्षकाना हे अपेक्षित होता,की मुले सांगणार नाहीत मग त्यांनी शिक्षा सांगितली "ठीक आहे ,कोणी शेंगा खल्या हे सांगणार नसलं तर त्या सर्वांनी उचला " आणि सर्व वर्ग साप करा.लगेच कामाला लागा,मुले कामाला लागली पण लोकमान्य टिळक त्यांच्या जागेवर शांत बसून होते.
     शिक्षकांनी त्यांना विचारले तू का सफाई करत नाहीस याचे कारण विचारले.तेव्हा ते मन्हाले मी त्या भियमुगाच्या शेंगा खाल्ल्या नाहीत. त्यामुळे मी ते शेंगाची तरपल उचलणार नाही.मग शिक्षक त्याला मानले कचराही केला नाही मग मी मघाशी विचारले कचरा कोण्ही केला तर तेव्हा बरा शांत बसलास.सांग मग आता कोण्ही खाल्ल्या शेंगा?" मला त्याचं नाव सांगायचं नवत मानून मी शांत बसलो.पण मी शेंगा खाल्ल्या नाहीत हे खर सांगतो".
      मग शिक्षक मनाले वा रे ,कोण खाल्ल्या शेंगा ते विचारलं तर ते नाही सांगणार आणि मी दिलेली शिक्षा ही नाही पाळणार,एक तर शेंगा कोण खाल्ल्या ते सांग नाहीतर टरपल उचल नहितर चालता हो वर्गाच्या बाहेर.
       लोकमान्य टिळकांनी त्यांचं दप्तर अवरल आणि वर्गातून वर्गामधून बाहेर निघुन आले.त्यांनी त्यांच्या मित्रांचे नाव ही सांगितले नाही आणि न केलेल्या चुकीची शिक्षा पण पाळली नाही.     

Story.2

गोष्टीचे नाव: एकाग्रता

       लोकमान्य टिळक हे शाळेत असताना ची ही गोष्ट आहे,इतिहासाच्या तासाला शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी भिंतीवरच्या काळ्याशार फळ्यावर अभ्यासाचे मुद्दे लिहायला सुरुवात केली. सवयीप्रमाणे विदयार्थ्यांचे लक्ष फळ्याकडे. पर्यायाने शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेल्या मुद्द्यांकडे मुळीच नव्हते. बहुतेक सर्वच जण खिडकीतून वर्गाच्या बाहेर पाहत होते. विदयार्थी फळ्याकडे लक्ष न देता वर्गाच्या बाहेर पाहत आहेत ही गोष्ट शिकवणाऱ्या शिक्षकांच्या लक्षात आली तसे ते विदयार्थ्यांकडे वळले आणि त्यांनी सूचना केली, “सर्वांनी फळ्याकडे, फळ्यावरच्या मुद्द्यांकडे लक्ष दया. मुद्दे मुकाट्याने लिहून घ्या शिक्षकांचा मोठ्या आवाजात आदेश होताच सारेच विदयार्थी शिक्षकांनी फळ्यावर मांडलेले, लिहिलेले मुद्दे लक्ष देऊन आपापल्या वहीत लिहू लागले.
     एक विदयार्थी मात्र जणू काही त्याने काही ऐकलंच नाही अशा आविर्भावात निवांतपणे बसला होता. तो काहीच लिहून घेत नव्हता. जो विद्यार्थी मुद्दे वहीत लिहून घेत नव्हता तो शिक्षकांच्या अचूक लक्षात आला. ते त्या विदयार्थ्याजवळ गेले. त्या विद्यार्थ्याला त्यांनी जागेवर उभे केले. शिक्षक त्या विद्यार्थ्यावर रागावले.विद्यार्थी शांतपणे उत्तरला, "सर, तुम्ही जे फळ्यावर लिहिलं आहे ते मला पूर्णपणे पाठ आहे. मग मी तेच वहीत कशाला लिहू?"
     शिक्षकांनी प्रश्न केला, "काय पाठ आहे तुला?"शिक्षकांनी असा प्रश्न करताच त्या विदयार्थ्याने शिक्षकांनी फळ्यावर जे लिहिले होते ते फळ्याकडे न पाहता धडाधड म्हटले. शिक्षक आश्चर्यचकित झाले. विदयार्थ्याशी आता काय बोलावं ? त्याला काय ले विचारावं हा प्रश्न शिक्षकांना पडला. शिक्षक काहीच र बोलत नाहीत हे पाहून तो विद्यार्थीच पुढे म्हटला,"सर, तुम्ही जेव्हा वर्गामधे शिकवत असता ना तेव्हा मी ते अत्यंत एकाग्रतेने ऐकतो आणि ग्रहण करीत असतो. त्यामुळे होतं असं की, तुम्ही शिकवलेला कुठलाही विषय सहजरित्या समजतो.' मित्रहो,इतक्या स्पष्ट शब्दांत स्वतःचं मत मांडणारा हा विदयार्थी कोण असेल बरे?
    एकाग्रतेचं आणि ग्रहणशक्तीचं वर्णन करणारा हा विदयार्थी म्हणजे लोकमान्य. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ' असे ठामपणे सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
            अश्या प्रकारे आपण लोकमान्य टिळकांच्या प्रसिद्ध अश्या भूयमुगाच्या शेंगांच्या टरपलाची आणि एकाग्रतेचा अश्या आपण शाळेतील गोष्टी बघितल्या आहेत 

लोकमान्य टिळक मराठी कविता|Lokmanya Tilak poem in marathi

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध 
हक्क आहे अशी गर्जना दिली ! 
भारतीय जनतेत स्वातंत्र्य प्राप्तीची
प्रेरणा निर्माण केली !

ज्यांच्या विचाराने प्रेरित 
झाले सर्व भारतीय लोक ! 
ते निर्भीड वक्ते, तडफदार 
जहालवादी नेते लोकमान्य टिळक !!

राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही, 
सरकारचे डोके आहे का ठिकाणावर! 
असे अग्रलेख लिहून ज्यांनी कोरडे 
ओढली इंग्रज सरकारवर !!

दडपशाही अन तुरुंगवासाची 
त्यांनी पर्चा नाही केली ! 
सतत सिंहासारखी सिंह 
गर्जनाच त्यांनी दिली !!

अशा या थोर राष्ट्रभक्त 
नेत्याचे गाऊ आपण गुणगान ! 
आजचे हे भारतीय स्वातंत्र्य 
मिळाले त्यांच्याच त्यागान !!

लोकमान्य टिळक मराठी चारोळ्या pdf |  Lokmanya Tilak Marathi charolya

सिंह गर्जना करायला 
काळीज पण सिंहाचेच लागते ! 
म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या 
चरणावर मान माझी सदैव झुकते !!

ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले सर्व
भारतीय लोक! ते निर्भीड वक्ते, 
तडफदार नेते लोकमान्य टिळक !!

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे 
" अशी सिंह गर्जना दिली !! 
भारतीय जनतेत स्वातंत्र्य प्राप्तीची
प्रेरणा निर्माण केली !

राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही, 
सरकारचे डोके आहे का ठिकाणावर ! 
असे अग्रलेख लिहून ज्यांनी कोरडे 
ओढली इंग्रज सरकारंवंर !!

दडपशाही अन तुरंगवासाची 
त्यांनी पर्वा नाही केली ! 
सतत सिंहासारखी सिंह गर्जनाच त्यांनी दिली !!





हे पण वाचा⤵️



FAQ
Q.1) लोकमान्य टिळकांचा जन्म कधी व कोठे झाला?
Ans.त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीत चिखली गावात झाला.

Q.2) लोकमान्य टिळकांच्या पत्नी चे नाव काय आहे?
Ans. लोकमान्य टिळकांच्या पत्नी चे नाव तापीबाईं हे आहे.

Q.3) लोकमान्य टिळकांनी न्यु इंग्लिश हायस्कुलची सुरुवात कधी केली?
Ans.१८८० साली न्यू इंग्लिश हायस्कुलची सुरुवात केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad