हनुमान जयंती 2022 मराठी माहिती| Hanuman jaynti marathi mahiti 2022.
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण हनुमान जयंती विषयी संपूर्ण माहिती,निबंध,अभंग बघणारा आहोत.
हनुमान जयंती 2022 मराठी निबंध| Hanuman jayanti marathi 2022.
महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी
होते.राजा दशरथाने पुत्र मिळवण्यासाठी यज्ञ केला. त्यामुळे अग्निदेवाला प्रसन्न झाले आणी त्यांनी राजा दशरथाच्या राण्या साठी पायस प्रदान केले.राजा दशरथाच्या राण्यां प्रमाणे अंजनीलाही खीर, यज्ञातील प्रसाद मिळाला होता व त्यामुळेच अंजलीच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा करतात. वाल्मीकि रामायणामध्ये अंजनीच्या पोटी हनुमान .हनुमानाचा जन्म झाल्यानंतर पहाटे उगवणारे सूर्यबिंब एखादे पिकलेले फळ आहे असे समजून हनुमाने त्याच्याकडे झेप घेतली,त्यादिवशी पर्वतीथि असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता.
सूर्याला गिळण्यासाठी येत असलेला हनुमानाला दुसरा राहू आहे या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकके. ते वज्र हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.यापासून सूर्योदयाच्या आधीकीर्तनाला सुरुवात करतात वा सकाळी सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीत जास्त करतात.हनुमान जन्माला या तिथीला हनुमानाची तत्वे आपल्या पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्नाय करत असतात.
हनुमान जयंतीच्या दिवशी श्री हनुमते नमः ह्या नावाचा जप जास्तीच जास्त केल्यामुळे मारुति तत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.वायू तत्व हे आग,तेज,वायु,पृथ्वी व आकाश या पेक्षा जास्त सूक्ष्म म्हणजे, जास्त शक्तीशाली आहे. अवघड तपश्चर्या करून अंजनीच्या पोटी शंकराचा जन्म होतो मुनीच्या आदेशानुसार अंजनी वायू देवाची प्रार्थना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वतःच तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनीला मूल होत नाही. ती तगमगते.
भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वतःच तिचा मुलगा होण्याचे आश्वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते.आणी पायसपात्र अंजनेच्या ओंजळीत पडले. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद आहे म्हणून तीने श्रद्धेने प्राशन केला.अंजनीला दिवस जातात. हनुमंताचा जन्म होतो.मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्रह्मतेजाचे प्रतीक आहे.
हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्यांच्यात लय करण्याचे सामर्थ आहे. रामभक्ती करतांना त्यांच्यात विष्णु तत्त्व आले. त्यामुळे त्यांच्यात स्थितीचे सामर्थ्यही आले. महाभारतातिल युद्धात श्री कृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले.तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.भूत, राक्षस यांसारख्या वाईट शक्तींपासून रक्षण सगळ्या देवतांमध्ये फक्त मारुतीला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. रावणाच्या लंकेमध्ये हजारो , लाखो राक्षस राहायचेतरीही ते हनुमानाला काहीही करू शकले नाही. त्यामुळे हनुमानाला राक्षासाचा राजा म्हटले जाते.राक्षसाने कोणाला पछाडले, तर त्या माणसाला हनुमानाच्या देवळात नेतात किंवा हनुमान स्रोत म्हणतात.
त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.लग्न न होर्णायापैकी जवळजवळ ३० टक्के व्यक्तींचे लग्न भूत, करणी इत्यादी वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत नाही. हनुमानाचा उपासनेने केल्याने त्रास दूर होतात व लग्न लवकर होन शक्य होते. १०% लोकांचे लग्न हे व्यक्तींचे लग्न यांच्या अवास्तव (जास्तीत जास्त) अपेक्षा असल्याने होत नाही. त्याच्या विषयी तशी अपेक्षा कमी केल्यानंतर लग्न होण्याची शक्यता असते.
नंतर वानरराज सुग्रीव यांच्या वानरसैन्याचा मंत्री म्हणून हनुमान काम पाहू लागले. तेव्हाच सीतामातेच्या शोधात भटकणाऱ्या राम व लक्ष्मण यांची आणि हनुमानांची भेट झाली. हनुमानाने समुद्र उड्डाण करून लंका गाठली व रामाचा निरोप सीतेला दिला. शवणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर हजर केले. त्याची शेपटी पेटवली, मारुतीने आपल्या जळत्या शेपटीने लंकेचे दहन केले. त्यानंतर राम व रावण यांचे घनघोर युद्ध सुरू झाले. या युद्धात हनुमानाने रामास खूप मोठी मदत केली. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या तळहातावर द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. हनुमान हा श्रीरामांचा अनन्य भक्त होता. श्रीरामांना उदंड आयुष्य मिळावे यासाठी मारुतीने सर्व अंगावर शेंदूर फासून घेतला. आपली छाती फाडून त्याच्या हृदयात वास करणाच्या श्रीरामांचे दर्शन सर्वांना घडवले. महाबली, बुढीवान वीर हनुमानास शतदा नमन.
हनुमान जयंती निमित्ताने मराठी अभंग | Hanuman jaynti marathi abhang.
नमो गजानना नमो हनुमंता
दोघात दोन देवा कोण बलवंता ॥धृ॥
गजानन म्हणे मी रिद्धी सिद्धी भारी ।
हनुमान म्हणे मी बाळ ब्रह्मचारी नमो...||१||
नमो गजानना नमो हनुमंता
दोघात दोन देवा कोण बलवंता ॥धृ॥
गजानन म्हणे माझ्या जानव्याचा जोडा ।
हनुमंत म्हणे माझ्या पायामध्ये तोडा नमो...|२||
नमो गजानना नमो हनुमंता
दोघात दोन देवा कोण बलवंता ॥धृ॥
गजानन म्हणे मी सिंहगड पाहीला ।
हनुमंत म्हणे लंकागडश्र जाळीला नमो... ||३||
नमो गजानना नमो हनुमंता
दोघात दोन देवा कोण बलवंता ॥धृ॥
गजानन म्हणे माझ्या नैवेद्याशी लाडू |
हनुमंत म्हणे मला तेलाचा गंडू नमो... ॥४।
नमो गजानना नमो हनुमंता
दोघात दोन देवा कोण बलवंता ॥धृ॥
गजानन म्हणे मी शिवाचा बच्चा ।
हनुमंत म्हणे मी रामाचा शिष्य नमो... ||५||
नमो गजानना नमो हनुमंता
दोघात दोन देवा कोण बलवंता ॥धृ॥
रामदास म्हणे मी कोणाला मानु ।
दोघामध्ये देव आहे सारखेच जाणू नमो...||६||
नमो गजानना नमो हनुमंता
दोघात दोन देवा कोण बलवंता ॥धृ॥
हनुमान जयंती मराठी पाळणा| Hanuman jaynti marathi palna.
चैत्र मासी पौर्णिमेला,
अंजनी पोटी पुत्र जन्माला,
साऱ्या नगरी हो आनंद झाला,
जो बाळा जो जो रे..||1||
पहिल्या दिवशी गणगोत बोलवा,
काळा टिका हो बाळाला लावा,
दृष्ट काढी अंजनी माता,
जो बाळा जो जो रे....||2||
दुसर्या दिवशी सारे आतुर,
पाहण्या त्याचे सुंदर रूप,
जो बाळा जो जो रे..||3||
तिसऱ्या दिवशी गर्दी खूप,
जन हर्षे पाहून मुख,
गाली हासे पवन सूत,
जो बाळा जो जो रे...||4||
चौथ्या दिवशी घाला अंघोळ,
कानी कुंडल गळ्यात माळ,
तेजस्वी दिसे सुंदर रूप,
जो बाळा जो जो रे...||5||
पाचव्या दिवशी पाहून लीला,
आशिष देती देव महाबलीला,
कौतुक बाळाचे नारदमुनींना,
जो बाळा जो जो रे...||6||
सहाव्या दिवशी मंगल प्रभाती,
इंद्र लोकी अप्सरा गाती,
बाळ असे हा देव अवतारी,
जो बाळा जो जो रे....||7||
सातव्या दिवशी किष्किंदा नगरा,
सुकुमार बाळाची हो चाले चर्चा,
अंजनी पोटी जन्माला हिरा,
जो बाळा जो जो रे....||8||
आठव्या दिवशी बाळ तान्हुले,
खोडकर खट्याळ खोड्या करे,
गोड गोजिरे रूप साजिरे,
जो बाळा जो जो रे...||9||
नवव्या दिवशी करे नवलाई,
लीला पाही अंजनी आई,
निजवण्या बाळाला गाई अंगाई,
जो बाळा जो जो रे...||10||
दहाव्या दिवशी इशस्तवन,
श्रवण करी केशरी नंदन,
आनंदे चराचर धरती गगन,
जो बाळा जो जो रे...||11||
अकराव्या दिवशी केली आरास,
बाळाला केला वेगळा साज,
मनी उल्हासे रामाचा दास,
जो बाळा जो जो रे...||12||
बाराव्या दिवशी आई अंजनी,
रेशमी दोरी पाळण्याची हलवि,
नाव ठेविले बाळ मारुती,
जो बाळा जो जो रे...||13||
हनुमानाला शेंदूर का लावतात | Hanumanala shendur ka lavtat.
हनुमान हे एक लोकप्रिय दैवत आहेत.श्री रामाचा प्रमुख सेवक म्हणून तो ओळखला जातो.हनुमानाचे नामस्मरण, आराधना,उपासना कोट्यावधी भावी नियमितपणे करत असतात.त्याचप्रमाणे हनुमानाला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे.मात्र ही प्रथा सुरु होण्यामागचे कारण काय घडले.मारुतीरायाला शेंदूर का अर्पण करतात हे आपण बघू.
प्रचलित कथेनुसार एकदा हनुमानाला भूक लागली होती तर तो भोजनासाठी सीता मातेकडे गेला तेव्हा त्याने माता शेतीला कुंकू लावते वेळेस बघितले.त्याने मातेला विचारले आपण कुंकू का लावता तेव्हा सीतेने सांगितले की हे सिंदूर आहे.आणि हे लावलं की आपल्या स्वामीचे आयुष्य वाढते. तेव्हा हनुमानाने विचार केला की चिमूटभर शेंदूराने आपल्या स्वामीचे आयुष्य वाढते.तर सर्व अंगाने सिंदूर लावल्याने आपल्या स्वामी अमर होतील.
हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले आणि प्रभु श्रीरामाच्या सभेमध्ये पोहोचले.हनुमानाचा हा अवतार बघून सर्वजण हसू लागले.पण श्रीरामाने हनुमानाचे प्रेम बघून खूप प्रसन्न झाले. त्यानंतर श्रीरामाने हनुमानास वरदान दिले की जो कोणी मनुष्य हनुमानाला मंगळवार किंवा शनिवार या दिवशी हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर अर्पित करेल त्यावर रामाची कृपा राहील आणि त्याच्या सर्व अडचणी दूर होतील.
तसेच सीता मातीच्या शेंदूर यामुळे अमर झालेल्या हनुमान लंका विजयानंतर प्रभू राम-सिता आयोध्येत आले. तर वानर सेनेला विदय दिले गेले. तेव्हा हनुमानला विदय देताना सीतेने आपल्या गळ्यातील मोत्याची माळ काढून हनुमानाला घातली बहुमुल्य मोती आणि हिरे यांनी घडवलेली माळ बघून देखील हनुमान प्रसन्न झाले नाही. कारण त्यावर प्रभू श्रीरामाचे नाव नव्हते तेव्हा सीता म्हणाली
मंग सिंधू धारण करून आपण कहा अजर-अमर व्हा तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पण करू लागले या शेंदूर यामुळे हनुमान अजर-अमर आहेत. त्याची पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात.
अनंत ऊर्जेचे प्रतीक आहे शेंदूर,विज्ञान प्रमाणे प्रत्येक रंगात विशेष प्रकारची ऊर्जा असते. हनुमानाला शेंदूर अर्पित केल्यावर तेव्हा दोन्ही डोळ्यांचे स्थित ऊर्जा केंद्र सक्रीय होऊन जात असे केल्याने मनात चांगले विचार येतात. हनुमानाला तूप मिश्रित सिंदूर चढवल्याने आपले सर्व संकट दूर होतात.
हे पण वाचा⤵️
FAQ.
Q.1) महाराष्ट्रात हनुमान जयंती कधी साजरी केली जाते ?
ANS.चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.
Q.2) हनुमानाच्या आई वडिलांची नाव काय आहे ?
ANS.हनुमानाच्या आईचे नाव अंजली आणि वडिलांचे नाव केशरी होते.
Q.3) हनुमान हे कोणाचे अवतार आहे ?
ANS.हनुमान हे शंकराचे अवतार आहे.