राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी माहिती भाषण निबंध | rashtriya vidnyan din marathi mahiti | National Science Day information in marathi
राष्ट्रीय विज्ञान दिन 2023: नमस्कार मित्रांनो आज राष्ट्रीय विज्ञान दिन, हा दिवस भारतरत्न सी. वी रमन यांना मिळालेला सर्वश्रेष्ठ नोबेल पुरस्कार मिळाला यानिमित्ताने त्यांची आठवण म्हणुन 28 फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढील लेखात पहायला मिळेल.
अनुक्रनीका toc
राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी माहिती | rashtriya vidnyan din marathi mahiti
1987 सालापासून भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस रामनांचे चे संशोधन आणि त्यांचे विज्ञान प्रसाराचे कार्य यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी. व्ही. रामन यांना 1931 नोबेल पारितोषिक मिळाले. त्याची आठवण म्हणून भारत सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
आज पर्यंत फक्त एका भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळाले आहे. हे पारितोषिक त्यांच्या प्रकाशाचे विकिरण सिद्धांतासाठी मिळाले होते. त्यांच्या सिद्धांताला जागतिक मान्यता मिळाली आहे. या महान शास्त्रज्ञाचा जन्म मद्रास इलाख्यातील त्रिचनापल्ली या प्रसिद्ध शहरात 7 नोव्हेंबर 1888 रोजी झाला. वडिलांपासून धैर्य व आईकडून उत्कटता व चिकाटी या गुणांच्या योग्य मिलाफ रामन यांच्या ठायी झाला. ऐक हुशार व बुद्धिमान विद्यार्थी म्हणून लवकरच त्यांची ख्याती झाली.
➡️छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण निबंध मराठी
वयाच्या बाराव्या वर्षी सन 1900 मध्ये रामन म्याट्रिकची परीक्षा पास झाले. वाल्टर येथील चौदाव्या वर्षी ते इंटरची परीक्षाही उत्तीर्ण झाले. इतक्या लहान वयात उच्च परीक्षा दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. पुढील शिक्षणासाठी ते मद्रास येथे आले व प्रेसिडेन्सी कॉलेजात दाखल झाले. गंमत म्हणजे एका प्राध्यापकाला चुकून हा छोटा मुलगा कॉलेजमध्ये आला असावा असे वाटले. तेव्हा रामन यांनी निर्भयपणे असे सांगितले की मी चुकून येथे आलो नसून बी.ए च्या वर्गात माझे नाव दाखल केले आहे म्हणूनच मी आलो आहे.
या छोट्या मुला बद्दल कौतुक वाटत असतानाच बी. ए. च्या पदवी परीक्षेत ते पहिल्या वर्गात पहिले आले. पदार्थविज्ञानशास्त्रत त्यांना सर्वाधिक गुण मिळाले व त्यांनी अॅनी सुवर्णपदक पटकावला. एम. ए. च्या परीक्षेतही त्यांनी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला.
आपल्या मनाविरुद्ध घरच्या मंडळींच्या दबावामुळे ते हिंदुस्थान सरकारच्या फडणीशी खात्याच्या परीक्षेला बसले. आश्चर्य म्हणजे या परीक्षेत ते सर्व भारतात पहिले आले. लगेच कलकत्त्यात प्रमुख डेप्युटी अकाउंटंट जनरल म्हणून नेमणूक झाली. पण या लठ्ठ पगाराच्या नोकरीत त्यांचे मन लागेना.मात्र त्यांनी आपले पदार्थ विज्ञानातील संशोधन सुरूच ठेवले. याच सुमारास अन्य पोटजातीतील लंकासुंदरी नावाच्या तरुणीशी विवाहबद्ध झाले.
एकदा डॉक्टर रामन जहाजाने इंग्लंडला जात होते. तेव्हा त्यानी पाहिले की समुद्राचे पाणी निळे दिसते. परंतु त्यांनी एका ग्लासात पाणी घेतले असता ते रंगहीन असल्याचे त्यांना आढळून आले. त्यातच त्यांनी संशोधन केले. प्रकाश जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून जात असतो तेव्हा त्याच्या तरंग लांबीत वाढ होते किंवा तरंगलांबी कमी होते. याच सिद्धांताला प्रकाशाचे विकिकरण असे म्हणतात.यालाच प्रकाशाचे अनियमित परावर्तन असेही म्हणतात. या सिद्धांताने त्यांना जागतिक दर्जाचे संशोधक म्हणून मान्यता मिळवून दिली आणि त्यांची नोबेल पारितोषिकासाठी निवड झाली.
भारत सरकारनेही त्यांना भारतरत्न देऊन उचित गौरव केला. आजचा दिवस त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. नोबेल पारितोषिक विजेता, राष्ट्रप्रेमी, ध्येयवादी अशा या भारतीय शास्त्रज्ञरत्नांने भारतीय विज्ञानाची विजय पताका जगभर फडकावली. अतिशय कृतकृत्य व शांत मनस्थितीत 20 नोव्हेंबर व 1970 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी डॉक्टर रामन मृत्यू पावले.
वरील संपूर्ण माहिती ही नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो आणि तुम्हाला शेवटी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद.
हे पण वाचा ⤵️