बैल पोळा कविता निबंध सजावट 2021 |pola festival essay poam decoration| pola festival in maharashtra 2021 | pola festival information in marathi
नमस्कार मित्रांनो
सर्वप्रथम माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा या सणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
बैलपोळा :
शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैलपोळा.
बैलपोळा या सणादिवशी शेतकरी बैलांना सर्व धान्यांची खिचडी खाऊ घालतात.त्यांच्यासाठी प्रत्येक घरात पुरणपोळीचा नैवेदय केला जातो. या सणाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मुक्या प्राण्यांविषयी प्रेम, आपुलकी सतत ठेवूया. त्यांना आपल्याकडून त्रास होणार नाही याची काळजी घेऊया.
कष्टाशिवाय मातीला आणि ,
बैला शिवाय शेतीला काही पर्याय नाही...
हजारो वर्षांपासून आपल्यासोबत आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा हा सन आहे... श्रावण महिन्याची सुरुवातच ही सणांची उधळण करणारीअसते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी,रक्षाबंधन अटपलेला असतो.यासनांबरोबरच सरत्या श्रावनात अमावस्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सर्जा राजाचा सण म्हणजे "बैलपोळा''. या दिवशी बैलाचा थाट असतो. पोळा या दिवशी त्यांना शेतातील कष्टाच्या कामापासून सुटका असते.बैलांना मारण्याची तुतारी/आसूड वापरण्यात येत नाही..
बैल पोळा सणाची सजावट | pola festival decoration
पोळ्याच्या आधल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याच्या दिवशी त्यांना तलाव,नंदी,ओढ्यात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणले जाते. या दिवशी बैलाच्या मानेला हळद व तुपाने शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झुल, सर्व अंगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे किंवा कार्डोड्याचे तोडे,खायला पुरणपोळीचा नैवेद्य असतो.
सर्व शेतकरी सकाळी आपल्या बैलांना नदिकिनारी नेऊन अंघोळ घालतात. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून, फुगे बांधून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात, बाशिंगे लावतात अशा वेगवेगळ्या प्रकारे सजविण्यात येते.
पोळा या दिवसाचे महत्त्व शेतकरी मित्र या वर्गात खूप आहे.शेतकरी या दिवसाची खुप आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकऱ्यांचा सखा जिवलग मित्र सर्जा राजाचा आजचा दिवस हा मनाचा असतो.पोळ्याच्या दिवशी बैलाला नांगराला किंवा गाडीला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते.
पोळा हा बैलांप्रती शेतकऱ्यांचे असनारे प्रेम दर्शवणारा एक सण आहे. बैलांवर प्रेम भावना व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषत: विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागातसुद्धा हा सण साजरा होतो, ज्याच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात.
यात्रीकीकरणामुळे शेतीमध्ये बैलांचे महत्त्व कमी झालेले आहे.तरिही अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी बैलांवर अवलंबून राहाव लागत. ऊन्हातान्हाकडे न बघता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा. कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकरणाच्या युगात शेतीत बैलांचा सहभाग कमी झालाय. तरीही बळीराजाच्या जिवनात त्याच स्थान कायम आहे.जीवत त्यांचे स्थान काम आहे. शेतकऱ्यांच्या जोडीनं राबणाऱ्या संख्या मित्राचं गोड कौतुक करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.पोळ्याचे दोन दिवस हे त्यांच्यासाठी विश्रांतीचे आसतात.त्यांना न्हाहु खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते.पुरणपोळी सारखा गोडधोड जेवणाचे पदार्थ त्यांना दिले जातत्.त्यानंतर बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते.
भारताच्या संस्कृतीत साजरे केल्या जाणाऱ्या सणांमध्ये बैलपोळा हा एक महत्वाचा सण आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशाला कृषीविषयक मोठी परंपरा आहे. आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कृषीक्षेत्र खुप मोठे वरदान आहे आणि याचा चालक म्हणजे शेतकरी, शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतामध्ये त्यांच्या सोबत रावणारे बैल, गाय, म्हैस तसेच रेडा, शेळी यासारखे प्राणी त्याच्या उपयोगी पडतात आणि त्याच्याप्रती समयाव म्हणून शेतकरी त्यांच्यासाठी हा अ साजरी करतो या सणाचे आपल्या जिवनात असे महत्व आहे म्हणून आपण सुद्धा यो खण्याच्या उपयुक्ततैय्या ऋणात राहुया पोळा हा एक मराठी सण आहे. हा मोठ्य आनंदाने साजरा करुया!!!
बैल पोळा सनाच्या कविता | pola kavita marathi
आला आला पोळा बैलांना सजवा,
गोडधोड खाऊ घाला प्रेमाने कुरवाळा.!
वर्षभर गिरवायचाच असतो त्याना
मग सतत कष्टाचाच पाढा.!!
दिली नाही पुरणाची पोळी तरी
रुसवा मनात धरणार नाही..!
फक्त वचन द्या मालक मला,
मी कत्तलखान्यात मरणार नाही..!!
गळ्यात कडा पाठीवरती झुल,
आज तुझाच सन आज तुझाच रे मान..!
तुझ्या अपार कष्टाच्या घामाणे बहरले माझे सारे शिवार, एका दिवसात कसे उतरतील रे उपकार..!!
आज पुंजले बैलाले,
फेडा उपकारचं देनं..!
बैला, खरा तुझा सनं,
शेतकऱ्या तुझं रीनं .....
वर्षभर शेतातील सर्व कष्टांची कामे बैल करतात. म्हणून एक दिवस त्यांना विसावा आणि गोडधोड खाऊ घालण्यासाठी हा सण. सायंकाळी बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. त्यांची पूजा केली जाते.
दक्षिण महाराष्ट्रात 'बेंदूर' या नावाने पोळा हा सण ओळखला जातो.
बैलपोळा शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैलपोळा.
बैलपोळा या सणादिवशी शेतकरी बैलांना सर्व धान्यांची खिचडी खाऊ घालतात. त्यांच्यासाठी प्रत्येक घरात पुरणपोळीचा नैवेदय केला जातो. या सणाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मुक्या प्राण्यांविषयी प्रेम, आपुलकी सतत ठेवूया. त्यांना आपल्याकडून त्रास होणार नाही याची काळजी घेऊया.
हे पण वाचा⤵️
FAQ
Q.1) शेतकऱ्यांचा आवडता सन कोणाता ?
Ans. शेतकऱ्यांचा आवडता सन बैलपोळा आहे.
Q.2) शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला कोणता नैवेद्य खायला घालतात ?
Ans.शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालतात.