हरितालिका व्रत मराठी माहिती २०२१ | Hartalika Puja Marathi mahiti | हरितालिका पूजा विधी व्रत साहित्य मराठी | Hartalika puja vidhi vrat sahitya marathi mahiti
नमस्कार आज आपण हरितालिका व्रत,पूजा,साहित्य आणि आरती याबद्दलची माहिती बघणार आहोत जसे की गणेश चतुर्थीच्या आधल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते.हा व्रत मुली आयुष्यात जोडीदार चांगला मिळावा म्हणून करतात तर सुवासनी स्त्रिया आपल्या पातिला उदंड आयुष्य लाभावे तसेच त्यांची कामामध्ये प्रगती व्हावी म्हणून करतात.
हरितालिका व्रत पूजा विधी साहित्य मराठी माहिती | Hartalika puja vidhi vrat sahitya marathi mahiti.
आता आपण पाहू या व्रताची पूजा कशी करायची आणि यासाठी लागणारं साहित्य किंचित जास्त आहे. पूजा अतिशय सोपी आहे. प्रथम साहित्य जसे की हळद, कुंकू, अष्टगंध, बुक्का, गुलाल, गुलखोबरे त्यानंतर सौभाग्यवाण यामध्ये बांगड्या, पोथ, हळद, कुंकू, आरसा या गोष्टी असतात.तांदूळ, खडीसाखर, जाणवे, कापसाचे वस्त्र 1 महादेवाच्या पिंडीला, 1 गणपतीसाठी आणि 2 हरतालिका गौरी साठी हे 4 कापसाचे वस्त्र बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पाणी, पंचामृत, फुले आणि दुसऱ्या एका बाजूला 12 विड्याची पान आहेत. त्यामध्ये 2 पानांचा एक विडा गणपतीसाठी आणि 2 पानांचे पाच विडे हे आपण हरतालिका गौरींच्या सामोर मांडणार आहोत.त्यासाठी 12 विड्याची पान, 6 खारका,6 बदाम,6 खोबऱ्याचे तुकडे,6 सुपाऱ्या यात 1 सुपारी extra आहे ती गणपती साठी ,पाच नाणी त्यानंतर बेलपण, दुर्वा आघाडा घायचा आहे.
यानंतर दुसऱ्या एका बाजूला 16 वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पान घ्यायची आहेत त्यामध्ये बेल,आघाडा,मधुमालती,दुर्वा, चाफा,कण्हेर,बोर,रूई, तुळस, आंबा,डाळिंब, धोतरा, जाई, मारवा, बकुळ, अशोक इत्यादि पत्री जुळवायच्या आहेत.जर तुम्हाला हे सर्व श्यक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही १६ झाडांची पाने घ्यायची आहेत ज्यांना फळ, फुले येतात आणि नैवेद्यासाठी फळ घायची आहेत. यानंतर आपल्याला महादेवाची पिंड बनवण्यासाठी वाळू लागणार आहे आणि ही वाळू धुवून घ्यायची आहे.
त्यानंतर दोन हरतालिका गौरी म्हणजे एक पार्वती आणि एक सखी तर ह्या घेतांना ह्यांची जी पिंड आहे त्याची दिशा ही एकच दिशेला असेल अशी निवडायचे आहे. या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे ते म्हणजे निरंजन, अगरबत्ती, कापूर या गोष्टी आहेत.
हरितालिका पुजेची मांडनी कशी करावी ?
पूजेची मांडणी कशी करायची हे आपण पाहनार आहोत.ज्या जागेवर तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा सर्वप्रथम स्वछ करून घ्यायची आहे. त्याच्यावरती एक चौरंग किंवा पाट ठेवायचा त्या पाटावरती ते स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचे आहे आणि पाटाभोवती रांगोळी काढायची आहे त्यानंतर या पाटावर दोन हरतालिका गौरी एक सखी आणि पार्वती मांडायची व त्यांना तांदळाच्या राशीवर मांडायच आहे आणि त्यांच्या डाव्या बाजूला तांदळाच्या राशीवर सुपारी ठेवायची आहे. ती गणपतीची सुपारी म्हणून ठेवलेली आहे. त्यानंतर खाली प्लास्टिक पेपर टाकून त्यावर वाळूने शंकराची पिंड बनवून घ्यायची आहे कारण आपण पंचामृत आणि पाण्याचा अभिषेक करतो त्याच्यामुळे खाली टाकलेलं वस्त्र खराब होण्याची शक्यता असते. त्यांच्यापुढे पाच विडे मांडून घ्यायचे आहेत दोन पानांचा एक वेडा त्याच्यावरती सुपारी, खारीक, बदाम, खोबरे, हळकुंड आणि एक नाणं ठेवायच आहे. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी करून घ्यायची आहे.
हरितालिका पूजा कशी करावी ?
आता आपण पूजा कशी करावी हे बघणार अहोत. सर्वप्रथम स्वतःला हळदीकुंकू लावून घ्यायचं यानंतर तुम्ही निरंजन, समई, दिवा जे काही पण आपण लावलय त्याची पूजा करून घ्यायची आहे त्याला हळद-कुंकू, अक्षता आणि फुले वाहून घ्यायचियेत अश्याच पद्धतीने समई निरंजन असेल तर पूजा करून घ्यायची आहे.
यानंतर कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपतीची पूजा पहिली करतो. तर आपण गणपतीचे प्रतिक म्हणून मांडलेली सुपारी आहे ती तामनात काढून घ्यायचीये. आता या सुपारीला म्हणजेच श्रीगणेशाला पण पहिलं स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आणि या पाण्यामध्ये हळद-कुंकू आणि फूलाच्या पाकळ्या टाकायचा आणि ह्याने स्नान घालायच त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचय आणि आता ही श्रीगणेशाची सुपारी आपण ज्या जागेवरून घेतली त्याच जागेवर परत ठेवून दयायची आहे. आता इथे आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तर आपण जो अष्टगंध घेतला होता तो त्या सुपारीला लावायचा यानंतर याच्यावरती अक्षदा टाकायचा जे काही जानव बनवलय ते घालायचंय व कापसाचे वस्त्र, फुल, दुर्वा, आघाडा त्यावरती अर्पण करायचा आहे. गणपतीसमोर विडा ठेवायचा त्यावर खारीक,खोबरं, हळकुंड,सुपारी हे घालून घ्यायच या विडयावरती देखील हळद कुंकू लावायचं फुल वाहायच आणि गुळखोबर्याचा नैवेद्य गणपती समोर ठेवायचा आहे. नंतर निरांजनाने ओवाळायच आहे.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा
यानंतर हरितालिका गौरी म्हणजेच पार्वती आणि सखी यांची पुजा करायची त्यांना हळदकुंकू लाऊन घ्यायचय अक्षदा वाहायचं फुल, गजरा, कापसच वस्त्र, आघाडा ठेवायचा आणि निरंजाणणे औक्षन करून घ्यायचय.
यानंतर आपण जी वाळुनी बनवलेली पिंड आहे त्याची पूजा करायची आहे यानंतर ओटीच समान आहे ते ठेवायच सौभाग्यवाण काही ठिकाणी खणानारळाने ओटी भरली जाते. जर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता यालादेखील हळद-कुंकू अक्षता वाहून घ्यायच्यात आणि पार्वती आणि सखीला नमस्कार करायचा आहे.
यानंतर अपण जी वाळूची पिंड बनवली आहे त्याची पूजा करणार आहोत. त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा गणपतीला आष्ठगंध, सखी पार्वतीला हळदीकुंकू, त्याचप्रमाणं पिंडीवरती गुलाल आणि बुक्का हे वाहून घ्यायचाय कापसाचे वस्त्र आणि बेलपान वहायच. बेलपान वाहताना उलट पिंडीवरती ठेवून द्यायचं असतं अक्षता वाहायचा आणि फुलं वाहून घ्यायच यानंतर आपण ज्या सोळा प्रकारच्या पतरी घेतल्या होत्या तर त्यावाहुन घ्यायच्या आणि पिंडीच औक्षण करायचं नंतर जे आपण समोर विडे मांडलेले आहेत याच्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पूजा झालेली आहे आता आपण नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्य दाखवायला फळं खडीसाखर आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवतात.
हरितालिकेच पूजन झल्यानंतर हरतालिकेची कथा वाचायची असते आणि कथा वाचून झाल्यानंतर हरतालिकेची आरती करायची असते.
अश्या प्रकारे आपण हरितालिका व्रत याची पूर्ण अशी माहिती बघितली आहे .अशी नवनवीन माहीत बघण्या साठी आपण आमच्या साईटला भेट द्या आणि अश्या नवनवीन माहितीचा लाभ घ्या धन्यवाद.
हे पण वाचा⤵️
FAQ
Q.1) हरितालिका व्रत कधी केले जाते ?
Ans.गणेश चतुर्थीच्या आधल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते.
Q.2)कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण कोणाची पहिले पुजा करतो ?
Ans.कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपतीची पूजा पहिली करतो.