Type Here to Get Search Results !

हिंदी दिवस मराठी माहिती 2021 | Hindi divas nibandh mahatva yogdan sahitya 2021

हिंदी दिवस मराठी माहिती 2021 | Hindi divas nibandh mahatva yogdan sahitya 2021

           

हिंदी दिवस मराठी माहिती 2021


       नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण हिंदी दिवसा बद्धल निबंध, महत्व, हिंदी भाषेचे योगदान, साहित्य शेत्रात तील भूमिका हे आपण सर्व खालील प्रमाणे बघणार आहोत.


अनुक्रनीका toc

हिंदी दिवस मराठी निबंध | Hindi Divas Marathi Nibandha.

      संपुर्ण भारतामध्ये दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जात असतो.14 सप्टेंबर रोजी आपण मोठया उत्साहात तसेच जल्लोषात हिंदी दिवस साजरा करत असतो.कारण 14 सप्टेंबर 1949 रोजीच भारतीय संविधानात हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता.

  हिंदी ही संपुर्ण भारतामध्ये बोलली जाणारी एक प्रमुख भाषा आहे. ही एक अशी राष्टीय पातळीवर बोलली जाणारी भाषा आहे जी आपल्याला प्रत्येकाला समजते तसेच हिंदीत आपल्याला बोलता देखील येते.एवढेच नव्हे तर हिंदी भाषेला आपल्या राष्टभाषेचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे.म्हणुन आपल्याला आपल्या राष्टीय भाषेचा असलेला अभिमान व्यक्त करण्यासाठी आपण दरवर्षी 14 सप्टेंबरला हिंदी दिवस देखील साजरा करत असतो.तसेच आपला भारत देश हा एक विविधतेने नटलेला देश आहे जिथे जास्तीत जास्त प्रमाणात हिंदी भाषा बोलली जाते.याचसाठी हिंदी भाषेलाच आपल्या राजभाषेचा दर्जा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता.आणि ह्याच निर्णयाचे सदैव प्रतिपादन करण्यासाठी 1953 पासुन संपुर्ण भारतात 14 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो.


हिंदी दिवसाचे महत्व :

      हिंदी दिवस तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला आपल्या राज्य भाषेची खरी जाणीव होत असते.म्हणून मग ह्याच राष्टीय एकात्मतेच्या ऐक्याच्या उददिष्टाने आपण सगळे भारतीय ह्या दिवशी एकत्र येत असतो आणि हिंदी दिवस साजरा करत असतो.

 

      हिंदी दिवस हा आपल्या मनात आपल्या राष्टाविषयी प्रेम जागृत करण्याचा दिवस आहे.कारण आज इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर इतका घटट बसला आहे.की आज कुठेतरी आपण आपल्या राष्टाभाषेपासुन ह्या मुळे दुर जाताना दिसुन येतो आहे.सर्व भारतीय तरुण तरुणी आज इंग्रजी शिक्षणाकडे वळता आहे.

 

       ह्याच मुळे मातृभाषेतील राष्टभाषेतील शिक्षण कुठेतरी खुंटत चालले आहे.याची जाणीव आपल्या तरुणाईला ह्या दिवशी करून दिली जाते.आणि सांगितले जाते की परकीय भाषेत नक्कीच शिक्षण करा कारण भाषा ही शेवटी भाषा असते.तिच्यात आपण कधीच भेदभाव करू नये आणि आज इंग्रजी भाषा ही आंतरराष्टीय पातळीवर बोलली जाणारी भाषा आहे त्यामुळे आपण ती शिकायलाच हवी आत्मसात करायलाच हवी.बदलत्या वेळेनुसार आपण देखील स्वताला बदलायलाच हवे पण ह्याच सोबत आपल्या हदयात आपल्या भाषेविषयी असलेले प्रेम देखील आपण जपायला हवे.परकीय भाषेच्या एवढयाही आहारी जाऊ नये की आपल्याला आपल्या राष्टभाषेचाच विसर पडुन जाईल.हे देखील आपल्याला हिंदी दिनी वेगवेगळया भाषणांद्वारे पटवून दिले जात असते.

हिंदी दिवसाचे उत्सव

                         हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर रोजी सर्व शाळा,महाविद्यालय,सरकारी कार्यालयांमध्ये सुदधा साजरा केला जातो.ह्याच दिवशी असे कर्तबगार स्त्री तसेच पुरूष ज्यांनी हिंदी भाषेतुन कुठल्याही एका क्षेत्रात मोठे यश संपादन केले असेल.आपल्या देशाचे नाव मोठे केले असेल अशा कर्तबगारांना स्वता देशाचे राष्टपती स्वहस्ते पुरस्कार देत असतात.

   एवढेच नव्हे तर ह्या दिवशी प्रत्येक शाळा,तसेच महाविद्यालयात वादविवाद स्पर्धांचे आयोजन केले जात असते.ज्यात कोणाला हिंदी भाषेविषयी दिलेल्या एखाद्या मुद्याचे समर्थन करावयाचे असते तर कोणाला तो मुददा मांडुन आपले मत प्रतिपादीत करून तो मुददा खोडुन काढायचा असतो.त्याचसोबत ह्याच दिवशी कविता स्पर्धा,भाषण तसेच निबंध लेखनाच्या स्पर्धा देखील घेतल्या जात असतात.वेगवेगळया सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते.महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढली जाते.

    ह्या दिवशी सर्व पुरुष धोती आणि कुडता परिधान करत असतात.आणि महिला साडया परिधान करत असतात.शा पदधतीने सर्व मिळुन हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जात असतो.

हिंदी भाषेचे योगदान : 
             प्रत्येक देशाच्या प्रगती आणि व्यावहारीक जीवणात त्यांच्या राष्टीय भाषेचा खुप महत्वाचा वाटा असतो.कारण आज आपण जी काही विचारांची देवाणघेवाण करतो आहे ती सर्व भाषेच्या माध्यमातुनच आज करतो आहे.

    तसेच आज आपण जे काही ज्ञान सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर करून प्राप्त करतो आहे.त्या सर्व ज्ञानाची प्राप्ती आपण हिंदी भाषेद्वारे करू शकतो आहे.आज आपण हिंदी भाषेत कोणतीही माहीती आपल्याला हवी असेल तर गुगलवर सर्च करतो मग लगेच आपल्याला हवी असलेली माहीती क्षणात आपल्यासमोर आपल्याला हिंदीमध्ये उपलब्ध होत असते.

    इतकेच नव्हे तर युटयुबवर जेव्हा आपण एखाद्या विषयावर सर्च करतो तेव्हा आपल्यासमोर हिंदी भाषेतील लाखो असे व्हिडिओ येत असतात.ज्यात आपल्याला हवी असलेली प्रत्येक माहीती हिंदी भाषेतुन आँडिओ व्हिडिओच्या माध्यमातुन दिलेली असते.म्हणजेच हिंदी भाषेच्या मुळे आज आपण एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवाण करू शकतो.आपल्या अंगी असलेले कौशल्य आपण डिजीटल माध्यमातुन इतरांना देखील हिंदीतुन शिकवू शकतो.एखाद्या क्षेत्राविषयी आपल्याला असलेले उत्तम ज्ञान आपण इतरांसोबत शेअर करू शकतो.दैनंदिन जीवणात सुदधा आपल्याला भाषेच्या माध्यमातुनच कोणताही व्यवहार करता येत असतो.विचारांची देवाण घेवाण करता येत असते.एकमेकांशी संवाद साधता येत असतो.यावरून कळुन येते की आपल्या जीवणात हिंदी भाषेचे किती मोलाची भुमिका आहे.

हिंदी भाषेची साहित्य क्षेत्रातील भुमिका :

          हिंदी ही एक सरळ आणि सोप्पी भाषा आहे.जिच्या माध्यमातुन आत्तापर्यत अनेक दिग्दज कवी तसेच लेखकांनी आपल्या अंगी निर्मितीशीलता प्रकट केली आहे.ही निर्मितीशीलता कोणी काव्याच्या माध्यमातुन जगासमोर आणली आहे तर कोणी लेख तसेच निबंध,कथा यांच्या माध्यमातुन आणली आहे.

    अशा ह्या दिग्दज साहित्यिकांमध्ये कवी मैथीलीशरण गुप्त,महादेवी वर्मा,सुभद्राकुमारी चव्हाण इत्यादींचा समावेश होता.इतकेच नाही आज जे काही नवीन कवी तसेच लेखक नवनवीन साहित्याची निर्मिती करता आहे.ते सुदधा आपल्या नवनवीन रचनांद्वारे हिंदी भाषेला अधिक समृदध करण्याचे काम करता आहे.

 

राष्ट्रीय एकात्मतेत हिंदी भाषेचा असलेला वाटा:

       आज आपल्या देशातील कित्येक तरूण तसेच तरूणी जरी खुप शिक्षण घेता आहे.परदेशातच उच्च शिक्षण घेऊन परदेशात नोकरी देखील करता आहे.चांगले वेतन कमविता आहे आणि मस्त ऐशोआरामाचे जीवन जगता आहे.पण हेच परदेशात ऐशो आरामात हायप्रोफाईल लाईफ जगत असलेले तरूण तरूणी जेव्हा पुन्हा आपल्या मायभुमीत म्हणजेच भारतात येत असतात.तेव्हा ते जी हाय प्रोफाईल भाषा संवादासाठी वापरत असतात ती कोणालाच कळत नसते.तेव्हा त्या एन आर आय तसेच भारतातुन परदेशात राहायला गेलेल्या लोकांना ऐथील लोकांसोबत विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हिंदी भाषेचाच आधार घ्यावा लागतो.हिंदी भाषेत व्यवहार केल्यावर तसेच संवाद साधल्यावरच इतरांना त्यांना काय सांगायचे आहे हे कळत असते.

     एवढेच नाही तर आज जे काही भारतात वेगवेगळया धर्माची वेगवेगळया भाषा बोलणारी लोक राहता आहे त्यांना जेव्हा कधी एकमेकांशी संवाद साधायचा असतो तेव्हा ते हिंदी भाषेचाच वापर करत असतात.कारण आज भारतात विविध धर्माची लोक राहतात आणि त्यांच्या भाषा देखील वेगवेगळया आहेत.मग अशा वेळी त्यांना एकमेकांशी संवाद साधायचा असेल किंवा विचारांची देवाण घेवाण करायची असेल तर त्यांना भाषेच्या अडथळयामुळे एकमेकांशी बोलता येणार नाही.कोणताही व्यवहार करता येणार नाही.असे होऊ नये यासाठी आज प्रत्येक धर्मातील वेगवेगळया भाषेचे पालन करत असलेले सर्व व्यक्ती एकात्मतेने हिंदी भाषेत एकमेकांशी संवाद साधणे अधिक पसंद करतात.कारण ही भाषा सर्व धर्मातील विविध भाषिकांना चांगल्या पदधतीने समजते आणि बोलता देखील येते.म्हणुन भारतातील सर्व विविध धर्मीय लोक आपापसात संवाद साधण्यासाठी हिंदी भाषेला प्रमुख प्राधान्य देतात.अशा पदधतीने आज हिंदी भाषेने सर्व धर्मियांना राष्टीय एकात्मतेद्वारे एकाच बंधनात सामावुन घेतले आहे.यावरून आपल्याला चांगल्या पदधतीने कळुन येते की आपल्या भारत देशाच्या राष्टीय एकात्मतेत हिंदी भाषेचा केवढा मोठा वाटा आहे.



  हे पण वाचा ⤵️

 
FAQ
Q.1) भारतात हिंदी दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans.संपुर्ण भारतामध्ये दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जात असतो.

Q.2) हिंदी दिवस आपण का साजरा करतो ?
Ans.14 सप्टेंबर 1949 रोजीच भारतीय संविधानात हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता म्हणून आपण हिंदी दिवस साजरा करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad