Type Here to Get Search Results !

गणेश चतुर्थी मराठी माहिती 2021 | Ganesh chaturthi marathi mahiti nibandh 2021

 गणेश चतुर्थी मराठी माहिती 2021 | Ganesh chaturthi marathi mahiti nibandh  2021

                  
गणेश चतुर्थी मराठी माहिती 2021

     नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण गणेश चतुर्थी विषयी माहिती बघणार आहोत ते आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

अनुक्रनीका toc


गणेश चतुर्थी मराठी माहिती 2021 | Ganesh chaturthi marathi mahiti nibandh 2021

 आज पाहावयास गेले तर प्रत्येक वर्षी गणरायाच्या आगमनाची लाखो गणेशभक्त मोठया उत्सुकतेने तसेच आतुरतेने वाट पाहत असतात.आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठया जल्लोषामध्ये तसेच आनंदाने आपल्या सगळयांच्या गणरायाचे स्वागत करत असतात.आणि आता सुदधा नेहमीप्रमाणे ह्या वर्षी देखील पुन्हा एकदा सर्व गणेशभक्तांच्या लाडक्या आराध्य दैवताचे म्हणजेच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.

म्हणुन आज ह्याच आनंदाच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण गणेशचतुर्थी म्हणजे काय?गणेश चतुर्थी कधी आणि केव्हा साजरी करतात?सर्व गणेश भक्त गणेश चतुर्थी का आणि कशी साजरी करतात?इत्यादी महत्वाच्या बाबींविषयी सविस्तर माहीती जाणुन घेत आहोत.


गणेश चतुर्थी म्हणजे काय | What is Ganesh Chaturthi.

गणेश चतुर्थी हा एक असा सण आहे जो समस्त हिंदु धर्मातील लोकांद्वारे एकत्रितपणे साजरा केला जातो.आणि ह्या सणाचे वैशिष्टय हे देखील आहे की हा सण फक्त भारतभुमीतच नाही तर परकीय देशातही सर्व गणेश भक्त मोठया हर्ष आणि उल्हासाने उत्साहात साजरा करत असतात.

पण आपला महाराष्ट हा एक असा एकमेव भुभाग आहे जिथे हा सण तसेच उत्सव सर्व गणेशभक्त मोठया जल्लोषाने साजरा करत असतात.आणि हिंदु धर्मातील लिखित पुराणांमध्ये सुदधा हे नमुद केले आहे की ह्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता.

याच कारणामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व गणेश भक्तांद्वारे गणेशाची आराधना,अर्चना केली जात असते तसेच श्री गणेशाच्या विशालकाय मुर्त्याची स्थापना देखील केली जाते.आणि गणपती बाप्पाच्या आगमनानंतर नऊ दिवस भक्तीभावाने सर्व गणेशभक्त गणपतीची आरती करतात.

आणि मग विसर्जनाच्या एक दिवस आधी गणेशाच्या मुर्तीची साजसजावट करत असतात.जी बघण्यासाठी सर्व भाविक लांब अंतरावरून देखील येताना आपणास दिसुन येतात.आणि मग सलग नऊ दिवस गणपतीच्या मुर्तीची स्थापणा करून झाल्यानंतर त्या गणपतीच्या मुर्तीचे एखाद्या जवळपासच्या नदीमध्ये तसेच समुद्रामध्ये विसर्जन करत असतात.

 गणेश चतुर्थी केव्हा आणि कधी साजरी करतात?

 हिंदु धर्मामध्ये पंचागांमध्ये देखील असे स्पष्टपणे नमुद केले गेले आहे की प्रत्येक वर्षी श्रावन महिन्यात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सर्व हिंदु धर्मीय गणेश चतुर्थी हा सण तसेच उत्सव मोठया जल्लोषात साजरा करत असतात.

2021 मध्ये गणेश चतुर्थी कधी साजरी केली जाणार आहे?

२०२१ मध्ये गणेश चतुर्थी ही १० सप्टेंबर रोजी शुक्रवारच्या दिवशी सर्व गणेशभक्तांद्वारे साजरी केली जाणार आहे. 


 गणेश चतुर्थी का साजरी केली जाते?

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला प्रत्येक वर्षी गणेश भक्त गणेश चतुर्थी ही साजरी करत असतात.आणि ही गणेश चतुर्थी सर्व गणेशभक्त ह्यासाठी साजरी करत असतात की कारण ह्याचदिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा पुत्र गणेश याचा जन्म झाला होता.आणि  हिंदु धर्मामध्ये ब्रम्हा,विष्णु आणि महेश ह्या त्रिदेवांचे स्थान समस्त देवलोकामध्ये अग्रगण्य आणि पुजनीय मानले जाते.म्हणुन गणेश चतुर्थी हा सण सर्व हिंदु धर्मातील भक्तजणांद्वारे आनंदात तसेच उत्साहात आणि मोठया जल्लोषात साजरा केला जातो.


गणेश चतुर्थीचे महत्व काय आहे?

गणेश चतुर्थी ह्या सणाच्या महत्वाबददल जाणुन घ्यावयाचे म्हटले तर हा महिना श्रावण महिन्याच्या सुरूवातीचा कालखंड असतो.आणि श्रावण महिना हा देवाधीदेव महादेव आणि माता गौरी म्हणजेच पार्वती यांच्या अत्यंत आवडीच्या महिन्यांपैकी एक महिना म्हणुन ओळखला जातो.आणि श्रावण महिन्यामधील सोमवार हा दिवस महादेवाच्या व्रत तसेच उपासनेचा दिवस म्हणुन देखील ओळखला जात असतो.आणि ह्याच महिन्यामध्ये दर मंगळवारी गौरी म्हणजेच माता पार्वतीची पुजा तसेच आराधना देखील केली जात असते.


गणेश चतुर्थी कशी साजरी करतात?

गणेश चतुर्थी हा सण आपण फक्त १० दिवस साजरा  करत असतो.आणि ह्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरात बाप्पाच्या मुर्तीची स्थापणा केली जाते.आणि रोज दहा दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोघे पहर बाप्पाच्या मुर्तीची विधिनुसार पुजा केली जाते.आणि पुजा अर्चना करुन झाल्यानंतर सगळयांना प्रसाद वाटण्यात येत असतो.

आणि प्रसादामध्ये गणपतीच्या आवडत्या पक्वानाचा म्हणजेच मोदकाचा समावेश केला जात असतो.आणि मग शेवटी दहा दिवस पुर्ण झाल्यानंतर गणरायाच्या मुर्तीचे वाजत-गाजत बँण्ड बाजा लावुन नदीत विसर्जन केले जाते.गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! .तसेच अर्धा लाडु फुटला गणपती बाप्पा उठला !अशी सर्वत्र गणेश भक्तांद्वारे एकच सुरात मेघ गर्जना करून गणरायाचा निरोप घेतला जातो.


गणेश चतुर्थीला व्रत तसेच उपवास का करतात?

गणेश चतुर्थीला आपण नेहमी व्रत तसेच उपवास का करतो?ह्यामागचे मुळ कारण काय आहे हे जाणुन घेण्यासाठी आपण गणेश चतुर्थीच्या व्रताची कथा आधी जाणुन घेऊयात.कारण ह्या कथेतच हे व्रत तसेच उपवास का केला जातो याचे कारण दडलेले आहे.

एकदा होते असे की देवाधी देव महादेव आणि गौरी पार्वती हे दोघे नर्मदेच्या काठावर बसलेले असतात.आणि करमणुकीसाठी माता पार्वती देवाधीदेव महादेव यांना चौपटीचा खेळ खेळायला सांगत असतात.परंतु कोण विजयी झाले आणि कोण पराभुत झाले हे ठरवण्यासाठी त्यांच्याकडे कोणी मध्यस्थी नसल्यामुळे महादेव एक पुतळा तयार करतात. 

पण तो पुतळा पार्वती जिंकली असताना देखील महादेवाला विजयी घोषित करतो.यावर क्रोधित होऊन माता पार्वती त्याला शाप देत असते.पण तो बालक खुप विवंचना करत असल्यामुळे त्या शापातुन मुक्त होण्यासाठी देवी पार्वती त्याला सांगतात.इथे काही कन्या येतील त्यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या व्रताची माहीती घे आणि ते व्रत कर मग तो बालक त्या मुलींकडून त्या व्रताविषयी जाणुन घेऊन स्वता 21 दिवस ते व्रत करतो.

आणि त्याची भक्ती तसेच श्रदधा बघुन गणेशजी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला हवे ते वरदान मागण्यास सांगतात तेव्हा तो गणेशाकडे प्रार्थना करतो की त्याच्या अंगात आणि पायात इतके बळ त्यांनी प्रदान करावे की तो चालत कैलासपर्वतावर शिव पार्वतीचे दर्शन घेण्यास जाऊ शकेल.

मग ह्याच व्रताविषयी महादेव पार्वतीला देखील सांगतात मग आपल्या मुलाच्या कार्तिकेयनच्या भेटीसाठी पार्वती  हे व्रत करतात आणि त्या दोघांची भेट देखील होते.तेव्हापासुन हे व्रत हे ईच्छापुर्तीचे व्रत म्हणुन ओळखले जाऊ लागले.


गणेश चतुर्थीच्या व्रताचे कोणकोणते नियम आहेत जे आपण पाळणे गरजेचे आहे?


  • गणेश चतुर्थीच्या दिवशी व्रत करताना आपण कधीही पिवळया रंगाचे कपडेच परिधान  करायला हवेत.

  • गणपत्ती बाप्पाला दुर्वा अधिक आवडतात म्हणुन त्यांना दुर्वा वाहणे आपण ह्या दिवशी अजिबात विसरू नये.

  • गणेश चतुर्थीच्या दिवशी जेव्हाही आपण गणेशाची आरती तसेच पुजा करतो तेव्हा आपण त्यांच्यासमोर सुपारी देखील ठेवायला हवी.

  • असे म्हणतात की गणपती बाप्पाला तुळस ही वज्र करण्यात आली आहे म्हणुन आपण गणपतीची पुजा करताना अजिबात त्यात तुळस वापरायची नाही.

  • गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीच्या समोर मोदक आणि तीळ या दोघांचा प्रसाद आठवणीने ठेवायला हवा.

  • असे म्हणतात की ह्या दिवशी जर आपण चंद्राचे दर्शन केले तर आपल्यावर काहीतरी खोटा कलंक तसेच आरोप देखील लागत असतो.म्हणुन आपण ह्यादिवशी चंद्राचे दर्शन अजिबात करू नये.

  • ह्या दिवशी कोणाशी भांडण करू नये तसेच कोणाशी कुठल्याही प्रकारचा वाद घालु नये. आणि शक्य असेल तर एखाद्या गाईला चारा खाऊ घालावा आणि तिची सेवा करावी.

  • गणेश चतुर्थीच्या दिवशी एखाद्या ब्राम्हमणाला जेवणाचे आमंत्रण देऊन त्याला जेऊ घालावे आणि त्यानंतर त्याला थोडीफार दक्षिणा देखील द्यावी .

  • जेव्हाही आपण गणपतीची पुजा करत असाल तेव्हा आपण आपला चेहरा नेहमी पुर्व दिशेला  तसेच उत्तर दिशेला ठेवावा.

 अशा प्रकारे आजच्या लेखातुन आपण गणेशचतुर्थी विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली आहे.आजचा लेख कसा वाटला याबाबद आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जास्तीत जास्त ठिकाणी ही माहीती शेअर देखील करा. 
 


FAQ
Q.1) गणेश चतुर्थी केव्हा आणि कधी साजरी करतात ?
Ans. हिंदु धर्मामध्ये पंचागांमध्ये देखील असे स्पष्टपणे नमुद केले गेले आहे की प्रत्येक वर्षी श्रावन महिन्यात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सर्व हिंदु धर्मीय गणेश चतुर्थी हा सण तसेच उत्सव मोठया जल्लोषात साजरा करत असतात.

Q.2) गणेश चतुर्थी कशी साजरी करतात ?
Ans.गणेश चतुर्थी हा सण आपण फक्त १० दिवस साजरा  करत असतो.आणि ह्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरात बाप्पाच्या मुर्तीची स्थापणा केली जाते.आणि रोज दहा दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोघे पहर बाप्पाच्या मुर्तीची विधिनुसार पुजा केली जाते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad